छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहरासह जिल्हय़ात सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील क्रांती चौकात विविध राजकीय पक्ष, संघटना, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विविध शासकीय कार्यालयांतही शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपायुक्त धनराज केंद्रे, दीपक मुगळीकर, डॉ. अनिल रामोडे, व्ही. व्ही. गुजर, राजेश जोशी, महेंद्र हरपाळकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, तहसीलदार रूपेश शिनगारे आदी उपस्थित होते. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रांती चौकात शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. औरंगाबाद शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. माजी खासदार उत्तमसिंह पवार, अॅड. सय्यद अक्रम, राजकुमार जाधव, डॉ. पवन डोंगरे आदी उपस्थित होते.
लातूर शहरात शिवजयंती उत्साहात
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या ३८३व्या जयंतीनिमित्त महोत्सव समितीच्या वतीने सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या सहभागाने लातूरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. गंजगोलाई येथून या रॅलीची सुरुवात झाली.
लातूर महापालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. राजीव गांधी चौक येथे शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समिती अध्यक्ष अॅड. समद पटेल, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. मूकबधिर व अंध शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great celebration of shivjayanti
First published on: 20-02-2013 at 01:39 IST