नाशिक तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या कार्यगौरव पुरस्कारांसाठी यंदा ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी चारुशीला कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी नीलेश पवार यांच्यासह २३ जणांची निवड करण्यात आली आहे. ४ जानेवारी २०१३ रोजी सकाळी अकरा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी व संबंधित कार्यालयातील कर्मचारी तसेच विशेष सामाजिक कार्य करणाऱ्या श्रमिकांना पत्रकार संघातर्फे पुरस्कार दिले जातात, अशी माहिती अध्यक्ष सुधाकर गोडसे व सरचिटणीस प्रकाश उखाडे यांनी दिली. तालुका पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यगौरव पुरस्कारासाठी निवड समितीने सूचित केलेल्या नावांवर सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यात सुरेश लोहकरे, दीपक थोरात, विनोद कुलकर्णी, शरद कदम, दत्तात्रय ठोंबरे, सुभाष महाले, सुशील नागमोती, चंद्रकांत बर्वे, भाऊसाहेब भुजबळ, कैलास गंगावाल, सामाजिक कार्य विशेष पुरस्कार जल्लोष ग्रुप (डॉ. प्रकाश पाटील, डॉ. संजय रकिबे, संदीप काकड), अरुण बिडवे, उपेंद्र मोरे, किशोर वाघ चारुशीला कुलकर्णी, गायत्री पगारे, अनिल गुंजाळ, उमेश आवनकर, नितीन बोराडे, लक्ष्मण घाटोळ, नीलेश पवार, पल्लवी जुन्नरे, देविदास जाधव, गणेश करंजकर, कृषी विशेष पुरस्कार संजय तुंगार यांचा समावेश आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मीडिया सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोडसे व उखाडे यांनी केले आहे.