देशातील अव्वल व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी पार्क येथील सावरकर केंद्र सभागृहात रविवार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचा सत्कार केला जाणार आहे. ख्यातनाम बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, महापौर सुनील प्रभु यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे.
या वेळी पं. डी. के. दातार यांच्या सीडीचे प्रकाशन केले जाणार आहे. तसेच गायिका देवकी पंडित यांचे गायन आणि दातार यांचे शिष्य राजन माशेलकर, रत्नाकर गोखले आणि मिलिंद रायकर यांचे सहवादनही ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर पं. दातार यांच्या सत्कारानंतर त्यांच्यावर तयार करण्यात आलेली ध्वनिचित्रफीतही दाखविली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२०२९४०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor to violin players d k datar
First published on: 04-12-2012 at 11:22 IST