इंधनाच्या वाढते दरांमुळे सतत वाढणारा तोटा विचारात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीने भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सात रूपयांपासून अकरा रुपयांपर्यंत ही भाडेवाढ करण्यात आली आहे.  कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने बसच्या भाडय़ात मार्च महिन्यात भाडेवाढ सुचविली होती.   भाडेवाढीवरून वाद निर्माण झाल्याने हा विषय समितीने प्रलंबित ठेवला होता. अखेर नुकत्याच   बैठकीत उपक्रमाला भाडेवाढ रद्द करणे परवडणारे नाही, असे मत सदस्यांनी मांडले. तिकीट दरात पहिल्या टप्प्यासाठी सात रूपये, दुसऱ्या टप्प्यासाठी नऊ आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ११ रूपये भाडेवाढ सुचविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबातमीNews
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in bus fares
First published on: 02-07-2013 at 08:46 IST