अशोक व्हटकर यांच्या कांदबरीवर आधारित ‘७२ मैल -एक प्रवास’ या चित्रपटातील राधाक्का साकारली आहे ती अभिनेत्री स्मिता तांबे हिने. राधाक्का ही व्क्तीरेखा मुळातच ग्लॅमरस नसल्याने तिला स्मिताच न्याय देऊ शकेल, असा विश्वास राजीव पाटील यांना होता. आणि त्याला स्मितानेही तेवढय़ाच सकारात्मक प्रतिसाद दिला. रापलेला चेहरा, सुरकुत्या आणि कधीही तेलाचा स्पर्श न झाल्याने डोक्यावरील पिंजारलेले केस असा राधााक्काचा अवतार. त्यामुळे तसे दिसणे गरजेचे होते. त्यासाठी स्मिताने सातारा जिल्ह्य़ातीलच एक खेडेगाव गाठले आणि सुरू झाला राधाक्काचा प्रवास. ‘पहिल्या दिवशी सकाळपासून ते थेट संध्याकाळपर्यंत टळटळीत उन्हात बसायला मी सुरुवात केली. साधारण एप्रिल, मे महिना असल्याने उन्हाचा तडाखा खूपच होता. पण, रापलेला चेहरा यावा म्हणून तब्बल दीड महिना मी हे चटके सहन केले. या संपूर्ण दिवसांमध्ये मी कधीही अंघोळ केली नाही,  असे स्मिताने सांगितले. त्यामुळे पहिल्या तीन ते चार दिवसातच अंगातून घामाचा वास येऊ लागला. पहिले काही दिवस गावात आलेल्या नटीबाबत गावक ऱ्यांना जे आकर्षण होते तेही गावकऱ्यांकडून संपले होते. त्यामुळे मी मुक्तपणे उन्हात दिवसभर बसायचे. कांदबरीमधील राधाक्काने पायात कधाही चपला घातल्या नसल्याने त्यालाही फाटा देण्यात आला. त्यामुळे दोन ते अडीच महिने मी चपलेविनाच फिरत होते. अनेकदा त्याचा त्रास झाला पण माझ्यासमोर ध्येय होते ते राधाक्काचे, असे स्मिताने सांगितले. आंघोळ नाही, डोक्याला तेलही नाही त्यामुळे माझ्या केसांचा अवतार अगदी राधाक्काच्या भूमिकेसाठी हवा तसाच झाला होता. राधाक्का कशी चालते यासाठी गावातल्याच एका वृद्ध महिलेचे चालणे मी आत्मसात केले, असे सांगणाऱ्या स्मिताने आपल्या या सगळ्या अभ्यासावर दिग्दर्शक राजीव पाटीलही लक्ष ठेवून होते, हेही सांगितले. चित्रीकरणाच्यावेळी एका हॉटेलवर मुक्कामाला आलो असताना माझ्या रुममध्ये सौंदर्यप्रसाधनाचे काही साहित्य नाही ना याची खात्रीही राजीव पाटील यांनी करुन घेतली होती, अशी आठवण स्मिताने सांगितली. राधाक्का ही व्यक्तीरेखा खूपच वेगळी होती. ती जगविताना मी स्मिता तांबे आहे हेच काही महिने विसरुन गेले होते, असे शेवटी तिने यानिमित्ताने बोलताना सांगित