रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा त्रिदशकपूर्ती सोहळा २२ जानेवारी रोजी होत असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी हे त्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष गोपीनाथ मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणारी ही संस्था असून दरवर्षी सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाते, असे प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्त्रबुध्दे व रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत       सांगितले.