कशाला हव्यात हिला नसत्या उठाठेवी, असं कित्येकदा वाटायचं. काही विचारायला आली तर उडवून लावायचो..गप्पांमध्ये मुद्दाम तिच्या विरूद्ध मत नोंदवायचो.. ती बोलू लागली तर दुर्लक्ष करायचो..मग कधीतरी लक्षात आलं की, आमच्यातला मतभेद कमी झालाय- म्हणजे मतांमधला विरोध संपला की मांडायचे मुद्दे सारखे झाले, माहीत नाही. पण तिच्या लॉजिकल मुद्दय़ांतून तिची जाणीव होत गेली आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला.. माझ्या स्वभावाच्या नेमक्या उलट टोकावर वावरणाऱ्या माऊशी आपली मैत्री कशी जडत गेली, हे आठवताना त्याच्या नजरेसमोर फ्लॅशबॅकचे तुकडे यायला लागले.. तिचं सदा खुश असणं, रस्त्यावर चालता – चालता थांबून झाडं निरखणं, तिचे न संपणारे ग्रूप्स नि ट्रेक्स..तिचं कुठूनतरी वाऱ्यासारखं टपकणं आणि तिची फेव्हरेट क्विक एक्झिट! ..त्याला घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं..
.. तो भानावर आला आणि काहीसा बिचकला.. का आपण तिच्याबद्दल एवढं बोलतोय? ‘टीवायला मी आणि माऊ बऱ्यापैकी एकत्र फिरायचो. कॉलेजमध्ये तर आम्हांला कपलच मानू लागले होते.. पण आम्हा दोघांना त्याचं काही नव्हतं आणि आमची कशी मैत्रीच आहे, भानगड वगैरे नाही, याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आमच्यापैकी एकानेही केला नाही.
 ‘कॉलेज डेज’ संपले, तसे दिवस पटापट जातायंत, असं दोघांनाही वाटू लागलं. आता ती तिच्या घरी परत जाणार होती.. एकमेकांचा निरोप कसा घेणार, अशी हुरहुर होतीच. पण असा काही क्षण आलाच नाही आमच्या दोघांच्या वाटय़ाला. तिला निरोप द्यायला मैत्रिणींचाच गोतावळा जमलेला प्लॅटफॉर्मवर. काहीजणी रडायच्या बेतात. मला तिच्याशी काही बोलायलाच नाही मिळालं. तिलाही माझ्याशी बोलायला वेळ झाला नाही. गाडी हलली आणि आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघत निरोपाचा हात हलवला.. मी घरी परतलो, जेवलो, झोपलो.. सारं काही रोजच्याप्रमाणे.. जणू काही बदललंच नव्हतं आयुष्यात.. खरंच?
पुढे काही दिवस यायची आठवण तिची.. म्हणजे तिच्या सवयींची! पिण्याआधी आपल्या कपातला थोडा चहा आधीच माझ्या कपात टाकणं, खायला सुरू करण्याआधी न चुकता स्वत:ची प्लेट पुढे सारत तिचं ‘टेस्ट तर करून बघ’ म्हणणं. परतायच्या वेळेस बस लांबून दिसली की जीव खात पळणं – अगदी बायसुद्धा न म्हणता! माझ्या आयुष्याच्या पटावरूनही ती गेली तशीच.. रंगमंचावरची तिची आवडती एक्झिट घेत! निरोपाचा बाय न म्हणताच!
पण मी का एवढा विचार करतोय तिचा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manya on the occasion of valentine day
First published on: 13-02-2013 at 12:59 IST