घरकामगार महिलांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात होती. राज्य शासनाच्या घरेलू कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, दारिद्रय़रेषेखालील यादीत समावेश केला जावा, किमान वेतन, निवृत्तिवेतन, विमा संरक्षण यांचा लाभ मिळावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व विजया कासोटे, राधाबाई यादव, मालती कांबळे, उषा माने, कमल हेगडे, सुमन चित्रे, जिल्हाध्यक्ष कृष्णा कांबळे आदींनी केले. जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदन देण्यात आले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha on collector office by domestic workers
First published on: 22-03-2013 at 01:19 IST