पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना धडक देऊन दोन मोटारसायकलस्वार फरार झाले. या धडकेत एक पोलीस हवालदार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घाटकोपर पूर्वेच्या महात्मा गांधी रोडवरील दरासेल चौक येथे पंतनगर पोलीस ठाण्याचे चंद्रकांत मोरे आणि यशवंत कदम हे दोन पोलीस गस्तीवर होते. त्यावेळी एक मोटारसायकल भरधाव वेगाने जात होती. संशय आल्याने या दोघांनी त्या मोटारसायकलीला थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी मोटारसायकल न थांबवता थेट कदम यांच्या अंगावर घातली. त्यानंतर मोटारसायकल तेथेच टाकून ते दोघे पळून गेले.