शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘शिवसेनाप्रमुख’ या चरित्रात्मक ग्रंथांची दुसरी आवृत्ती दहा वर्षांनंतर पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. नंदकुमार टेणी लिखित हे पुस्तक अविष्कार पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीला, म्हणजे येत्या २३ जानेवारी रोजी या चरित्रात्मक ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा विचार असल्याचे प्रकाशक अजित पडवळ यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. २००२ नंतरचा आत्तापर्यंतचा शिवसेनेचा सर्व इतिहास या दुसऱ्या आवृत्तीत दिला जाणार असून मराठीनंतर हाच ग्रंथ हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रकाशित होणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त २००२ मध्ये दादर येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात ‘शिवसेनाप्रमुख’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. कार्यक्रमास स्वत: बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने झालेला तो पहिला जाहीर कार्यक्रम होता. तीन ते साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा ग्रंथ म्हणजे माझे आत्मचरित्र असल्याचे सांगितले होते, अशी आठवण यावेळी पडवळ यांनी सांगितली.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
Prakash Awade, dhairyasheel mane,
कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण

आणखी वाचा – हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता- हेडली

शिवसेनाप्रमुखांवरील या पुस्तकाची संकल्पना आम्ही बाळासाहेबांना सांगितल्यानंतर सुरुवातीला ते तयार नव्हते. त्यांना राजी करण्यासाठी आम्ही सहा महिने प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांनाही साकडे घातले. अखेर हा ग्रंथ करण्यास बाळासाहेबांनी यांनी मान्यता दिली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास आपण स्वत: येऊ, असेही त्यांनी सांगितले आणि तो शब्द त्यांनी पाळला, असे सांगून पडवळ म्हणाले की, त्यावेळी पुस्तकाच्या तीन हजार प्रती काढल्या होत्या. अवघ्या काही महिन्यातच त्या संपल्या. त्यानंतर पुस्तकाविषयी लोकांकडून व शिवसैनिकांकडून आमच्याकडे सातत्याने विचारणा होत होती. शिवसेनाप्रमुख आता हयात नाहीत. त्यांना श्रद्धांजली म्हणून या ग्रंथात काही भर टाकून दुसरी आवृत्ती काढण्याच्या दृष्टीने आम्ही काम सुरू केले आहे. दुसऱ्या आवृत्तीत २००२ ते आत्तापर्यंतचा सर्व इतिहास, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची सर्व माहिती, शिवसेनेत झालेले सर्व बदल अशा सर्व टप्प्यांचा समावेश असेल. शिवसेनाप्रमुखांची काही दुर्मिळ छायाचित्रेही यात असतील.

आणखी वाचा – निर्मात्याने ३ महिने डांबले, शिवसेनाप्रमुखांनी सोडविले – सुप्रिया पाठारे

राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांवरील ‘छायाचरित्र’ पुस्तक काढले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले. ‘ठाकरे फॅमिली’ नावाचे आणखी अन्य एक पुस्तक प्रकाशित झालेले आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील हे एकमात्र चरित्रात्मक पुस्तक असल्याचा दावाही पडवळ यांनी केला.