कवठेमहांकाळ येथील तरुणीचा झालेला खून हा बुवाबाजीतूनच झाला असल्याचे पालकांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी स्पष्ट झाले. मृत तरुणीला कुंडली चांगली नाही, शांती करण्यासाठी पूजा करणे गरजेचे आहे, असे सांगत कर्नाटकातून पंढरपूरला बोलावून अपहरण करण्यात आले होते. भोंदू महाराजाने अपहरण केलेल्या तरुणीवर कवठेमहांकाळ जवळ बलात्कार करून खून केला असल्याचे स्पष्ट झाले असून, तथाकथित महाराज घटनेनंतर परागंदा झाला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडीच्या शिवारात निर्जन स्थळी तरुणीचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळला होता. याबाबत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  मृत मुलीचे नाव श्रीदेवी हनुमाप्पा बजंत्री (वय १७, रा. मेहबूबनगर, ता. शिदनूर, जि. रायचूर) असे आहे. मुलीच्या पालकांनी तथाकथित महाराज मुिखदा तुकारात कांबळे (वय ५५, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) याने मुलीचे पंढरपूर येथून अपहरण करून लांडगेवाडी येथे खून केल्याची तक्रार आज दाखल केली.
मुिखदा कांबळे याने सदर मुलीची कुंडली चांगली नाही. कुंडलीवरील अनिष्ट ग्रहांची छाया दूर करण्यासाठी पूजाअर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगत मुलीसह पालकांना सोलापूर येथे बोलावून घेतले होते. सोलापूरहून पंढरपूरला आणून मातापित्यांना पूजेसाठी देवळात पाठविले. या दरम्यान मुलीला घेऊन महाराजाने कवठेमहांकाळकडे प्रयाण केले.  लांडगेवाडी येथे निर्जन स्थळी मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या केली.
तथाकथित महाराज कुची येथील असून त्याची पत्नी २० वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली आहे. तेव्हापासून तो अशाच पद्धतीने वागत आला आहे. सहा महिन्यांपूर्वी बुलढाणा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण त्याने केले होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी त्याला बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बुवाबाजी करीत मुलींना फसवून अत्याचार करण्याची या महाराजाची पद्धत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर आरोपी फरारी असून पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याचे कवठेमहांकाळचे निरीक्षक संजय सावंत यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of young woman due to black majic in kavathemahankal
First published on: 01-02-2014 at 03:40 IST