मुरमाडीतील तीन बहिणींच्या हत्याप्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा सर्व शक्तीनुसार करीत असून आतापर्यंत प्राप्त झालेले शवविच्छेदन, तसेच फॉरेन्सिक अहवाल यातील विरोधाभास मात्र संशयाची वादळे निर्माण करणारा ठरला आहे. असे असले तरी शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांवर संबंधित डॉक्टर्स आजही ठाम आहेत, मात्र मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलचे न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. पाठक यांच्या वक्तव्यानंतर पुढे काही दिवसात येणारा हैदराबादच्या सेंट्रल फॉरेन्सिक लेबॉरेटरीचा अहवाल तपासाला आणखी कोणते वळण देतो, याबद्दल चर्चेला पेव फुटले आहे.
नैसर्गिक व अनैसर्गिक पाशवी बलात्कार व हत्या, अशा शवविच्छेदन अहवालानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर उशिरा प्राप्त झालेला नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबचा अहवाल बलात्कार झालाच नसल्याचे सांगून गेला. काल परवा चर्चेत आलेले डॉ. पाठक यांचे वक्तव्य अतिप्रसंग झाला नाही, असे सांगत मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, असे स्पष्ट करतो. मृतदेहावर झालेल्या जखमा मरणोत्तर आहेत. शवविच्छेदन करताना आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टर नव्हते. डॉक्टरांनी योग्य काळजी घेतली नाही. मृतदेह विहिरीत फेकले गेले की, मुलींनी उडय़ा मारल्या, हे देखील समोर आलेले नाही. डायटन अहवाल ते स्पष्ट करेलच. हैदराबादची सेंट्रल फॉरेन्सिक लेबारेटरी, व्हिडीओ क्लिप व उरलेला व्हिसेरा यावरून काय निष्कर्ष काढते, इकडे पोलीस यंत्रणा लक्ष देऊन आहे. आता २४ दिवसानंतर तपासाची गती वाढते की मंदावते, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
दरम्यान, या तिन्ही बहिणींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील पाच डॉक्टरांच्या पथकातील महिला स्त्रीरोग तज्ज्ञ मात्रच्यानी केलेल्या शवविछ्छेदनावर आदही ठाम आहेत. त्यांच्या अहवालानुसार यातीन बहिणींपैकी लहान दोघींवर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार झालेला आहे. तशास्वरूपाच्या जखमा त्यांच्या शरीरावर आढळल्या. या रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सी.एस. खोब्रागडे म्हणाल्या, ६ व ९ वर्षांच्या असलेल्या दोन बहिणींचे गुप्तांग व गुदद्वारावर बलात्काराच्या जखमा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. याचाच अर्थ आतापर्यंतची माहिती आणि व्हिडिओ क्लिपिंग्जच्या आधारावर फॉरेंसिक अहवाल तयार केला गेला असावा, असे दिसते.