सिडकोतील बॉडी झोन जिमखान्याच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत निवृत्ती धोंगडे यांनी ‘बॉडी झोन श्री २०१३’ हा किताब मिळविला. जिमखान्याचे संचालक भाऊदास सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
उद्घाटन भगवंतदादा दोंदे, राजू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, साहेबराव सोनवणे, आशा थापा, राम भामरे, संदीप दोंदे, पंकज पवार आदी उपस्थित होते. ५५ किलो गटात भरत वळवी, ६० किलो गटात विजय कडभाने, ६५ किलो गटात निवृत्ती धोंगडे, ७० किलो गटात गुंजन सिंह यांनी गटविजेतेपद प्राप्त केले. गटविजेत्यांमध्ये ‘बॉडी झोन श्री २०१३’ या किताबाकरिता अंतीम लढत झाली. पंचांनी निवृत्ती धोंगडे यांच्या बाजूने कौल दिला. विजय कडभाने यांनी बेस्ट पोजरचा किताब मिळवला. भरत वळवी यांनी मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा किताब मिळवला.
या प्रसंगी अक्षय गायकवाड यांनी संगीताच्या तालावर उत्कृष्ट प्रदर्शन केले. सूत्रसंचालन शाम बोरसे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2013 रोजी प्रकाशित
निवृत्ती धोंगडे ‘बॉडी झोन श्री’
सिडकोतील बॉडी झोन जिमखान्याच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत निवृत्ती धोंगडे यांनी ‘बॉडी झोन श्री २०१३’ हा किताब मिळविला. जिमखान्याचे संचालक भाऊदास सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
First published on: 17-01-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nevrutti dhongde body zone shree