महापालिका हद्दीतील माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ केल्याबाबतच्या आदेशाची प्रत माजी सैनिक सेवाभावी कल्याणकार मंडळात उपलब्ध आहे. माजी सैनिकांच्या १७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी हे पत्र सदस्यांना नेता येऊ शकेल, अशी माहिती संघटनेचे सहसचिव जी. डी. सूर्यवंशी यांनी दिली.
सन २००६ पासून महापालिका हद्दीतील माजी सैनिकांना मालमत्ता करात १०० टक्के सवलत देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच कन्नड नगरपरिषदेनेही असाच ठराव मंजूर केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माजी सैनिकांना व त्यांच्या नातेवाईकांना विशेष अतिथी म्हणून उपचार न देता मोफत उपचार दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन वैद्यकीय अधिष्ठातांना दिले जाईल, असेही सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old shivsena members wants free medical service
First published on: 13-02-2013 at 02:14 IST