दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बाजारगल्लीत पिंपळगाव बसवंत येथील युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.
विश्वास किसन गांगोडे (३०) यांच्यावर एका व्यक्तीने लाकडी दांडका व दगडाने हल्ला केला. रात्री गस्ती पथकावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमानुषपणे शरीरावर वार केल्याने मृतदेहाची ओळख पटण्यास पोलिसांना वेळ लागला. मूळ पिंपळगाव येथील असणारा गांगोडे हा सध्या दिंडोरी येथील औताळे परिसरात राहत असल्याचे उघड झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना मयताची पत्नी व वडिलांना बोलवावे लागले.
येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.