कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय पातळीवरील छायाचित्रांची ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदा प्रथमच स्पर्धेत आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय गटाचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी ‘तरूणाई’ (युथ) हा विषय देण्यात आला आहे. दुसऱ्या खुल्या गटासाठी डेली लाईफ, जनरल न्यूज, स्पॉट न्यूज, स्पोटर्स न्यूज आणि पिक्चर ऑफ द इयर हे विषय आहेत. इलेक्ट्रॉॅनिक्स माध्यमातील पत्रकारांसाठी असलेल्या तिसऱ्या गटास बेस्ट व्हिज्युअल आणि बेस्ट स्टोरी हे विषय आहेत. सर्व गटांमधून निवडल्या गेलेल्या पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्हासह रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे ६६६.३स्र्िू.१ॠ या संकेतस्थळावर ३१ डिसेंबपर्यंत पाठवावीत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-समीर मरकडे-९८२०२०९३७८, राजन जोशी-९८६९१६१४५६, संतोष शिंदे-९३२२३४४७७३.  संतोष कोळसुलकर-९८२०३९०३४४. विभव बिरवटकर-९८६७७८२२८७. इलेक्ट्रॉॅनिक्स माध्यमातील स्पर्धकांनी आपल्या सीडीविषयी गजानन बाळापूरकर (९८९२७८९७३६) आणि प्रदीप-९९३०३६०४७८ यांच्याकडे संपर्क साधावा.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online competition on photografs by thane distrect press club
First published on: 04-12-2012 at 11:47 IST