उरण मधील एनएनएमटी बसेस व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यातील संतोष माने या एसटी बस चालकाने पुण्यात विरूध्द दिशेने बस चालवून अनेक निरापराधांचे बळी घेतल्याची घटना घडली होती.

पुण्यातील संतोष माने या एसटी बस चालकाने पुण्यात विरूध्द दिशेने बस चालवून अनेक निरापराधांचे बळी घेतल्याची घटना घडली होती. असाच काहीसा प्रकार नुकताच उरण मध्ये घडला. मात्र बसमधील काही तरूणांच्या प्रसंगावधानामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या तरूणाला पकडून उरण पोलीसांच्या ताब्यात दिले असता पोलीसांना दुर्लक्ष करीत या तरूणाला सोडून दिल्याने उरण मधील नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उरण ते नवी मुंबई दरम्यानच्या दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएनएमटी बस सेवेच्या बसेचे उरण मधील पेन्शनर्स पार्क हे शेवटचे स्थानक आहे.या स्थानकात बस आल्यानंतर बस सुरूच ठेवून प्रवाशी बसले की,चालक बस घेऊन जातात मात्र अशाच प्रकारे बस सुरू असतांना एका तरूणाने अचानकपणे बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तरूणांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच या तरूणाला बाजुला केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे उरण मधील एनएमएमटी बसेस व प्रवाशांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Passengers and buses security question in uran

ताज्या बातम्या