जागतिक आडकेवारीनुसार ३ कोटी ३४ लाख लोक सध्या एचआयव्ही / एड्सने बाधित आहेत. भारतात त्यापैकी १.४ ते २ टक्के इतके एचआयव्ही बाधित आहेत. एड्सबाबत जनजागृती करण्याबरोबरच ‘एचआयव्ही गो अवे फ्रॉम ग्लोब’ अशी घोषणा असलेली रॅली ‘मेडस्केप इंडिया असोसिएशन’तर्फे १ डिसेंबरला काढण्यात येणार आहे. जुहू चौपाटीवर ही रॅली जाणार आहे. यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी तसेच अनेक मान्यवर डॉक्टर सहभागी होणार आहेत. जुहू चौपाटीवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता रॅली निघणार आहे.
एड्सबाबत महिलांना प्राथमिक माहिती देणे आवश्यक असून एआरटीसारख्या आरोग्यसेवा तातडीने एड्सबाधित महिलांना देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून मेडस्केप इंडियाच्या डॉ. सुनीता दुबे यांनी रॅलीचे महत्त्व स्पष्ट केले. एचआयव्ही, एड्सविषयक जनजागृतीची आजही नितांत गरज असून त्याचबरोबर अॅण्टीरिट्रोव्हायरल औषधांसाठी आणि प्रतिबंधक कार्यक्रम हाती घेण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे, असेही दुबे यांनी पत्रकात म्हटले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी मेडस्केपइंडिया संकेतस्थळ अथवा मंगेश यांच्याशी ९६६४५५५७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2012 रोजी प्रकाशित
जागतिक एड्सदिनी जुहू चौपाटीवर रॅली
जागतिक आडकेवारीनुसार ३ कोटी ३४ लाख लोक सध्या एचआयव्ही / एड्सने बाधित आहेत. भारतात त्यापैकी १.४ ते २ टक्के इतके एचआयव्ही बाधित आहेत. एड्सबाबत जनजागृती करण्याबरोबरच ‘एचआयव्ही गो अवे फ्रॉम ग्लोब’ अशी घोषणा असलेली रॅली ‘मेडस्केप इंडिया असोसिएशन’तर्फे १ डिसेंबरला काढण्यात येणार आहे.

First published on: 30-11-2012 at 12:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally on world aid day