एरव्ही नबाबी जेवण म्हटले की लखनऊ वा हैदराबाद यांचीच आठवण येते. पण लखनऊजवळील रामपूरच्या नबाबी जेवणाचा अनुभव देणारा ‘रामपुरी फूड फेस्टिव्हल’ वांद्रय़ातील ‘सोफीटेल’ या पंचतारांकित हॉटेलात सुरू झाला आहे. तिखट-मसाल्यांचा अगदी नाममात्र वापर, पण तरीही रुचकर जेवण हे ‘रामपुरी’ पदार्थाचे वैशिष्टय़ आहे.
 नबाबी रान रामपुरी, भागू कबाब, रामपुरी व्हेज कोफ्ता, झिंगा तिल तिनका, कोहिनूर बिर्याणी, मूर्ग मुगले आझम अशा पदार्थाची रेलचेल आहे. या ‘रामपुरी’ जेवणाचे वैशिष्टय़ म्हणजे ते फार चमचमीत नसते. तेल-तूप आणि मसाल्यांचा अगदी माफक वापर यात करण्यात आला आहे. मसाल्यांचा वापर पदार्थ तिखट करण्याऐवजी त्याला एक गंध आणि जिभेवर हलकेच तरळणारी खमंग चव देण्यासाठी केल्याचे जाणवते.
यातील कोहिनूर बिर्याणीचे वैशिष्टय़ म्हणजे ती शिजवताना एक चमचाही तूप-तेल-लोणी वापरले जात नाही.    खास लखनऊहून मसाले या खाद्यमहोत्सवासाठी मागवण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबपर्यंत दुपारी १२ ते ३ आणि सायंकाळी ७ ते मध्यरात्री १२ या वेळेत हा खाद्यमहोत्सव सुरू राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rampuri food festival
First published on: 29-11-2014 at 12:43 IST