शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री, ज्या मतदारसंघात येते तो प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ. नगरसेवक असलेल्या प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांना गेल्या वेळी उमेदवारी दिली गेली आणि मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांचा त्यांनी सात हजार मतांनी पराभव केला. तब्बल ६० टक्के मतदार हा शिवसेनेला मानणारा असल्यामुळे बाळा सावंत यांना कसलाच धोका नाही. मनसेच्या शिल्पा सरपोतदार या त्यांचे फक्त मताधिक्य कमी करू शकतात. काँग्रेसला विशिष्ट वर्गातील मते पडत असतात. त्यातच समाजवादी पार्टीचा उमेदवारही विशिष्ट समाजाची चांगलीच मते खातो. राष्ट्रवादी वा भाजपचा या मतदारसंघात अजिबात प्रभाव नाही. मोठय़ा प्रमाणातील सरकारी वसाहत, खेरवाडीतील म्हाडा वसाहती, वांद्रे कुर्ला संकुलाजवळील भारत नगर, रेल्वे स्थानकाजवळील बेहराम पाडा असा हा मतदारसंघ लोकसभेत जरी काँग्रेसच्या पारडय़ात बहुमत टाकत असला तरी विधानसभेत मात्र शिवसेनेकडेच झुकलेला असतो. म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास आणि सरकारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या समस्या हे कळीचे मुद्दे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००० पर्यंतच्या झोपडय़ा शासन अधिकृत करू शकते. परंतु ४० वर्षे सरकारी नोकर असलेल्यांच्या वसाहती त्यांच्या नावावर करू शकत नाही. आमची सत्ता येणारच आणि या वसाहती तात्काळ त्यांच्या नावावर होतील. खेरवाडी जंक्शन येथील वाहतूक कोंडी असो वा म्हाडा वसाहतींचा प्रश्न असो, हा शिवसेनेच्या प्रमुख अजेंडय़ावर आहे. रखडलेला पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी सेनेचे सरकारच निर्णय घेऊ शकते. म्हाडा रहिवाशांना मोठी घरे मिळावीत, यासाठी केलेल्या आंदोलनात शिवसेनाच पुढे होती. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण निधी आणला
 प्रकाश सावंत, विद्यमान आमदार, शिवसेना</strong>

सेनेचे प्राबल्य असले तरी काँग्रेसला मानणारा वेगळा वर्ग या ठिकाणी आहे. माजी खासदार प्रिया दत्त यांनी या मतदारसंघात भरपूर काम केले आहे. काँग्रेसला भरघोस मते देणारा हा मतदारसंघ आहे. माजी आमदार व मुंबईचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांचाही या मतदारसंघाचा चांगला संपर्क आहे, त्याचा फायदा मिळेल. स्थानिक आमदारांबाबत असेलली नाराजीही आपल्या पथ्यावर पडेल.
संजीव बागडी, काँग्रेस</strong>

उमेदवार
प्रकाश सावंत, विद्यमान आमदार, शिवसेना * दहावी ल्ल मालमत्ता – स्थावर : १७ लाख; जंगम : एक कोटी ४० लाख)
संजीव बागडी, काँग्रेस ल्ल बी.कॉम *  मालमत्ता – स्थावर :  ३५ लाख ६९ हजार; जंगम : ६४ लाख ५० हजार )
संतोष धुवाळी, राष्ट्रवादी ल्ल  बी.कॉम * मालमत्ता – स्थावर : ५० लाख; जंगम : एक कोटी ४५ लाख)
शिल्पा सरपोतदार, मनसे ल्ल बी.कॉम *  मालमत्ता – स्थावर : एक कोटी ४२ लाख; जंगम : ४ कोटी ५० लाख)
कृष्णा पारकर, भाजप ल्ल अकरावी * मालमत्ता – स्थावर : १९ लाख; जंगम : ०)

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of bandra east assembly constituency
First published on: 11-10-2014 at 12:59 IST