शहरात चोरी व घरफोडय़ांचे सत्र अद्याप सुरुच असून वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला.
मालेगाव स्टॅण्ड परिसरात वैश्य डिस्ट्रीब्युटर्समधील चोरीला चोवीस तास उलटत नाही तोच, वेगवेगळ्या ठिकाणी दुकाने फोडण्याची घटना घडली. सिडको परिसरातील अमोल कर्पे यांचे मुंबई नाका परिसरात सोनाली पान स्टॉल आहे. रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. सिगारेटचे बॉक्स, पितळी भांडे असा ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना प्रशांतनगर येथे घडली. अमृतदीप सोसायटीत नितीन संपत यांचे सिस्टीम केअर दुकानातून चोरटय़ांनी दोन लॅपटॉप पळविले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना जेल रोड परिसरातील पंजाब कॉलनीत घडली. बंद घराचा कडीकोयंडा तोडून रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी प्रवेश केला. ४९ हजार रोकड लांबविण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गंगापूर रोड परिसरातील आनंदनगर सोसायटीतून दुचाकी चोरटय़ांनी पळवून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onचोरीRobbery
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery continue in different part of nashik
First published on: 18-09-2014 at 01:42 IST