डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ डिसेंबर रोजी पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात तिसरे ‘सम्यक साहित्य संमेलन’ होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन दलित व स्त्रीवादी चळवळीच्या अभ्यासक डॉ.माया पंडित यांच्या हस्ते होणार आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, नामदेव ढसाळ, डॉ. रावसाहेब कसबे, संमेलनाध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. संमेलनात कवी संमेलन व विविध कार्यक्रमांबरोबरच महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ आणि सध्या चर्चेत असलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. संमेलनाच्या समारोपात डॉ. गंगाधर पानतावणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.