कल्याण येथील सप्तशृंगी स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या महिलांनी स्वस्त दरात भाजी विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वाहनाद्वारे रामबागेत निरनिराळ्या संकुलांत फिरून बचत गटाच्या महिला भाजी विक्री करणार आहेत.
माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांच्या संकल्पनेतून या बचत गटाने हा विक्री व्यवसाय सुरू केला आहे. टेम्पो रिक्षा वाहनात लोखंडी रॅक्स टाकून भाज्यांचे क्रेट ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्नर परिसरातून या महिला भाजी खरेदी करणार आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय भाज्यांची विक्रीही केली जाईल, असेही गुजर-घोलप यांनी सांगितले. भुजबळ वाडी परिसरातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बचत गटाच्या सर्व सदस्यांना या योजनेचा फायदा होईल, असा विश्वास अध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

ban on meat sale caste system marathi news
मांसविक्रीवर बंदी हा जातीव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न!
demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना