डोंबिवली रेल्वे स्थानकातील पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यासाठी स्वतंत्र तक्रार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या तक्रार कक्षात सदैव दोन महिला पोलीस कर्मचारी व अन्य दोन कर्मचारी उपस्थित असतील. लोकलमध्ये किंवा रेल्वे फलाटावर कोणाही तरुण, पुरुषाकडून एखाद्या महिलेची छेडछाड होत असेल तर सदर महिलेने रेल्वे पोलीस ठाण्यातील विशेष कक्षात तक्रार करावी. तातडीने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन दोषीवर कारवाई केली जाईल, असे वळवी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seprate brachside in railway police for womens complaints
First published on: 03-01-2013 at 01:54 IST