वाळूज एमआयडीसीतील लुमॅक्स ऑटो लि. या कंपनीतील कायम कामगार कर्मचाऱ्यांना दरमहा ७ हजार ८१ रुपये वेतनवाढ करण्यात आली आहे. वेतनवाढीच्या करारावर रविवारी सहय़ा करण्यात आल्या. या करारामुळे या कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांना दरमहा सरासरी २५ ते २७ हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच मागील सात महिन्यांच्या वेतनवाढीच्या फरकापोटी ५५ ते ६० हजार रुपये मिळणार आहेत.
औरंगाबाद मजदूर युनियन व कंपनीच्या व्यवस्थापनात हा करार झाला. सीटूचे जिल्हाध्यक्ष उद्धव भवलकर, उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रुडकर, लुमॅक्सचे कामगार प्रतिनिधी शांताराम हिवराळे, अजय पुंड, अशोक हजारे, श्रीकांत माळी, श्याम सुतार, संतोष सावळे तसेच व्यवस्थापनातर्फे महाव्यवस्थापक गजराजसिंह दहिया, उपाध्यक्ष राजेश दुबेवार, विभागीय व्यवस्थापक प्रताप सरकार यांच्यासह बी. एम. ढाकणे, एम. एस. गोरे, एस. बी. मोरे, एस. बी. जगताप आदींनी या करारावर सहय़ा केल्या. कराराचा कालावधी ३ वर्षांचा आहे. याशिवाय कामगार-कर्मचाऱ्यांना इतर सेवासुविधांचा लाभ मिळणार आहे. या मोबदल्यात कामगारांनी २५ चासीसची उत्पादनवाढ देण्याचे मान्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven thousand rs increase in lumax auto co
First published on: 20-11-2013 at 01:49 IST