‘आई राजा उदो’चा गजर, तसेच संबळाच्या निनादात तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटस्थापना बुधवारी भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
पहाटे तीनच्या सुमारास तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. नंतर नित्योपचार पूजा व दुपारी धुपारती होऊन शाकंभरी नवरात्रोत्सवाची घटस्थापना झाली. नवरात्रोत्सवाचे मुख्य यजमान राजेश मलबा यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन मंगल आरती झाली. शाकंभरी नवरात्रोत्सव कालावधीत १७ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. नवरात्रोत्सवातील जलयात्रेचा कार्यक्रम सर्वात मोठा असतो. जलयात्रा रविवारी (दि. १२) सकाळी ७ वाजता पापनाश तीर्थापासून निघणार असल्याचे मंदिर संस्थानकडून सांगण्यात आले. शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच तुळजाभवानीची नित्योपचार पूजा व अलंकार महापूजा केली जाते. या नवरात्रोत्सवास धाकटे नवरात्र म्हणूनही ओळखले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakambhari festival of tuljabhavani mata osmanabad
First published on: 09-01-2014 at 01:35 IST