कलायात्रिक व नाटय़जल्लोष आयोजित नटश्रेष्ठ शाहू मोडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत न्यू लॉ कॉलेज, नगर यांच्या जाहला सोहळा अनुपम या एकांकिकेला पहिला क्रमांक मिळाला. शाहू मोडक करंडकाचे ते मानकरी झाले.
अभिनेते सदाशिव अमरापूरकर, सुनंदा अमरापूरकर व मिलिंद शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. सविस्तर निकाल याप्रमाणे- डॉ. श्रीराम रानडे करंडक- कुक्कुटवध (संगमनेर महाविद्यालय), दत्तोपंत अडगटला करंडक- लबाड बिबटय़ा ढ्वांग करतोय (सन फार्मा कॉलेज, नगर).
दिग्दर्शन, रघुनाथ क्षीरसागर पारितोषिक- दिपक शर्मा, सुधाकर निसळ पारितोषिक- संजयकुमार दळवी. अभिनय-पुरूष-मधुकर तोरडमल पारितोषिक- दिपक शर्मा, सदाशिव अमरापूरकर पारितोषिक-अविनाश सूर्यवंशी. अभिनय स्त्री-मीना पाल सासणे पारितोषिक- मिनल शिंदे, वसुधा गंधे पारितोषिक- स्वाती पंचमूख,
सवरेत्कृष्ट वाचिक अभिनय- अनिल क्षीरसागर पारितोषिक- अनघा पंडित. लक्षवेधी अभिनय- मिलिंद शिंदे पारितोषिक- योगेश साळवे. विद्यार्थी लेखन- श्रीनिवास भणगे पारितोषिक- पूजा पुंडे, नेपथ्य- पेंटर श्रीगोंदेकर पारितोषिक- सचिन मोरे, प्रकाश योजना- मोहन मनवेलीकर पारितोषिक- विशाल कदम, संगीत- रुस्तूम हाथीदारू पारितोषिक- गणेश शेडगे, रंगभूषा- रामचंद्र शित्रे पारितोषिक-कोमल पाटील. स्वप्नील साळवे, अनिकेत सोनवणे, विशाल अहिरे, हर्षां केणेकर, अर्चना गायके, निर्मल देवळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
डॉ. सतीश साळुंके व अभिजीत झुंजारराव यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. अमरापूरकर, शिंदे यांनी शाहू मोडक या नटश्रेष्ठांची आठवण या निमित्ताने नगरकरांनी जपली आहे याचे कौतुक केले. जिल्ह्य़ातील नाटय़कला या स्पर्धेमुळे वाढीला लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला अभिनेते प्रकाश धोत्रे, सुलभा व सुशिला मोडक, स्वप्नील साठे, सतीश लोटके आदी उपस्थित होते. अमोल खोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रविण कुलकर्णी यांनी निकाल वाचन केले. प्रिया बापट यांनी आभार मानले.