विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या ६९ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन ११ डिसेंबर रोजी विवेकानंद आश्रमात करण्यात आले आहे.
त्यानिमित्य विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होणार असून शुकदास महाराजांचे आर्शिवचन देखील पार पडणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांनी दिली.
याही वर्षी शुकदास महाराजाचा वाढदिवस विवेकानंद आश्रमाच्या वतीने थाटात साजरा केला जाणार आहे. ११ डिसेंबर रोजी महाराज वयाची ६९ वष्रे पूर्ण करणार आहे.
गेल्या ४० ते ४५ पेक्षा अधिक वर्षांच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी सुमारे १ क ोटीपेक्षा जास्त रुग्णांना व्याधीमुक्त करून विश्वविक्रम
के ला असून रुग्णसेवेचा हा ध्यास अद्यापही दर शनिवार, रविवार आणि सोमवार १५ ते १७ तास रुग्णसेवेत असतात. ११ डिसेंबर रोजी सकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान मंगलधून, मंत्रघोष, दिंडीची परिक्रमा होणार असून ८ ते १० वाजेदरम्यान शुकदास महाराजांचे
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह शालेय उपक्रम व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडणार आहे.
याशिवाय, मोफत आरोग्य शिबीर, औषधी वाटप, भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असून नामवंत डॉक्टर आपली सेवा देणार आहे.
संध्याकाळी ६ ते ७.३० वाजेदरम्यान सज्जनसिंग राजपूत, गजाननदादा निकम,  अभय मासोदकर, शाहीर ईश्वर मगर,
सुभाष सवडतकर व संच गायन, प्रार्थना सादर करतील. रात्री ७.३० ते ९ या वेळात वृध्दाश्रमातील वृध्दांना कपडे वाटप, महाराजांचा सत्कार आणि आर्शिवचन देखील पार पडणार आहे.
आगामी विवेकानंद ोन्मोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर विवेकानंद आश्रमात कार्यकारी मंडळाची आमसभा यावेळी पार पडणार असल्याची माहिती संतोष गोरे, विष्णूपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukdas maharaj birth anniversary celebration in vivekanand ashram today
First published on: 11-12-2012 at 12:54 IST