मुंबईतील सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात सध्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कलाप्रदर्शन भरले आहे. प्रदर्शनाचे शेवटचे दोन दिसव शिल्लक असून विविध विषयांवर आधारित या प्रदर्शनास कलारसिकांचा  चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान २३ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
 या प्रदर्शनात दीपिका तांडलेने प्रथम, पवन राजूरकरने द्वितीय व साशा चेरियनने तृतीय पुरस्कार मिळविला आहे.  दीपिकाने युनायटेड कलर्स ऑफ बेनेटनची जाहिरात करताना समलिंगी संबंधाची समस्या प्रोजेक्टमधून मांडली आहे. पवनने कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत  कासव, हरण, वाघ, उंदीर, मोर, शहामृग, कीटक यांच्या चित्रांचा सुयोग्य वापर केला आहे. साशाने ‘ग्रीन बॅग प्रोजेक्ट’मध्ये ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ हा संदेश दिला आहे.  विठ्ठल पवार, आशीष बोयनेला ‘बेस्ट इलेस्ट्रेशन’चा पुरस्कार मिळाला आहे.
आशीषने चहा पिताना रंगणाऱ्या गप्पा चित्रांतून मांडल्या आहेत. नेहाली लालगेच्या विविध पिंजऱ्यांना ‘बेस्ट डिस्प्ले डिझाइन’चा पुरस्कार मिळाला आहे. ‘लाच देऊन पुढची पिढी बिघडवतोय’ असा संदेश शॉर्टफिल्ममधून देण्यात आला आहे.   रतन टाटा, ए.आर. रहेमान, राज ठाकरे, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, अण्णा हजारे यांची व्यक्तिचित्रे व व्यंगचित्रे देखणी झाली आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sir j j school of art annual art exhibition in mumbai
First published on: 22-02-2014 at 02:07 IST