कोरोची (ता. हातकणंगले) येथील महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने चोरटय़ांनी बुधवारी लांबवले. सायंकाळी गजबजलेल्या इचलकरंजी शहरातील शाहू कॉर्नर परिसरात ही घटना घडली. याबाबत रचना राजेंद्र पाटील (वय ३७ रा. कोरोची) यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. रचना पाटील या त्यांच्या वहिनी अश्विनी कारदगे यांच्या समवेत सायंकाळी इचलकरंजीमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. शाहू कॉर्नर परिसरातील दुकानामधून साडय़ांची खरेदी करून त्या बाहेर पडल्या होत्या. आयडिया शोरूम समोरून जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी पाटील यांच्या गळ्यातील गंठन हिसका मारून पळवून नेले. गंठनचा काही भाग पाटील यांच्या हाती लागला. मात्र उर्वरित सुमारे चार तोळ्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. पाटील यांचा आरडाओरडा ऐकून तेथे जमलेल्या नागरिकांनी चोरटय़ांचा पाठलाग केला. पण चोरटे पसार झाले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
धूम स्टाईलने गंठण लांबवले
कोरोची (ता. हातकणंगले) येथील महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने चोरटय़ांनी बुधवारी लांबवले. सायंकाळी गजबजलेल्या इचलकरंजी शहरातील शाहू कॉर्नर परिसरात ही घटना घडली.
First published on: 03-01-2013 at 06:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snatched chain of dhoom style