दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष व महिलांनी चांगला सहभाग नोंदविला. सोलापूरच्या अनिल पवारने पुरुष गटात, तर महिला गटात अहमदनगरच्या निकिता नागपुरेने पहिले पारितोषिक पटकावले. पुरुष गटात वासीमच्या भास्कर कांबळेने दुसरा व तावरजखेडा येथील सूर्यकांत फेरेने तिसरा क्रमांक, तर परभणीच्या ज्योती गवतेने महिला गटात दुसरा व नांदेडच्या मीनाक्षी गायकवाड हिने तिसरा क्रमांक मिळविला.
संस्थेच्या प्रवेशद्वारापासून स्पर्धेस प्रारंभ झाला. आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई मुरलीधर इन्नानी, सचिव रमेश बियाणी उपस्थित होते. पुरुष व महिला अशा दोन गटांतील स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले.
पुरुषांसाठी ११, तर महिलांसाठी ५ किलोमीटर अंतराची स्पर्धा झाली. शहरात ठिकठिकाणी स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी मुला-मुलींचे पथक उभे होते.
शहर   पोलीस    उपअधीक्षक    तिरुपते    काकडे यांच्या    हस्ते    विजेत्यांना    पारितोषिके     देण्यात आली.