महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आठव्या राज्यस्तरीय औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाटय़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (शुक्रवारी) सायंकाळी ६ वाजता खासदार चंद्रकांत खैरे, सिने-नाटय़ कलावंत डॉ. दिलीप घारे, महापौर कला ओझा, बजाज ऑटोचे उपमहाव्यवस्थापक जवाहर फिरोदिया यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
दि. ३१ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता तापडिया नाटय़मंदिरात ही स्पर्धा चालणार आहे. उद्या ‘विठ्ठला’, शनिवारी कालप्रवाह, १९ जानेवारी दर साल दर शेकडा, २१ जानेवारी अल्टर्स, २२ जानेवारी शह, २५ जानेवारी झोपा आता गुपचूप, २६ जानेवारी विठ्ठला, २८ जानेवारी सुखाशी भांडतो आम्ही, २९ जानेवारी विमोचन, ३१ जानेवारी येस माय डियर ही नाटके रसिकांना विनामूल्य पाहावयास मिळतील. नाटय़प्रेमी मंडळींनी मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहून नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद विभागाचे कल्याण आयुक्त नरेंद्रसिंह नागभिरे व प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांनी केले आहे.