स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक यासह अन्य विविध क्षेत्रात चित्पावन ब्राह्मण समाजाने खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानाची यशोगाथा आता चरित्र कोशाच्या माध्यमातून उलगडली जाणार आहे. अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघातर्फे हा चरित्र कोश प्रकाशित केला जाणार आहे.
या चरित्र कोशाचे संपादन आणि संकलन अखिल चित्पावन ब्राह्मण सेवा संस्थेच्या अध्यक्ष व कार्यवाह यांनी केले असून ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची प्रस्तावना या कोशास लाभली आहे. चरित्र कोशाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन येत्या ३ फेब्रुवारी पुण्यात पेशवे घराण्याचे वंशज प्रा. उदयसिंह पेशवा यांच्या हस्ते एका कार्यक्रमात होणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र एज्यकेशन सोसायटीचे एम. ई. एस. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरुड येथे होणार आहे.
चरित्र कोशाचे स्वागतमूल्य ५०० रुपये असून चित्पावन बांधवांसाठी देणगी मूल्य ४०० रुपये आहे. नोंदणीसाठी आशुतोष गोखले (९८६७०१६०७३) यांच्याशी किंवा माधव घुले,  चित्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली (०२५१-२८६१५६२) यांच्याशी संपर्क साधावा.