जुगार खेळणाऱ्या दहाजणांना अटक

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या दहाजणांना अटक केली. आरोपींकडून रोख १३ हजार ३०० रुपये व पत्त्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या दहाजणांना अटक केली. आरोपींकडून रोख १३ हजार ३०० रुपये व पत्त्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांच्या पथकाने गस्त घालत असताना शहरातील चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे ही कारवाई केली. कारवाईत नईमखान जिलानीखान (वय २४), अजय घनश्याम बरंडवाल (वय २६, पदमपुरा), शेख इरफान शेख इस्माईल कुरेशी, शेख शकील शेख मुराद कुरेशी, राधाकिसन पंढरीनाथ फटाकडे, रईस रफीक कुरेशी (वय २८), शेख अशपाक शेख पाशा (वय ३८), शेख अशफाक अब्दुल बहाब (वय ३२), संतोष सुरेश भालेराव (वय २६) व सोनू वीरभद्रा बाबडीकर (वय २६) यांना अटक केली. या सर्वाविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हय़ाची नोंद करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ten gamblers arrested in aurangabad