शहराच्या सिडको भागात एन ३ परिसरात राहणाऱ्या श्वेता बोरसे हिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, तिला यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी देवेश पाथ्रीकर यास जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शहरासह जिल्ह्य़ात या प्रकाराने मोठी खळबळ उडाली होती.
श्वेता विनायकराव बोरसे या उच्चशिक्षित तरुणीने ३१ डिसेंबर २००५ रोजी विषारी द्रव्य (कीटकनाशक) प्राशन करून आत्महत्या केली. श्वेताने मृत्युपूर्वी सात पानी पत्र लिहून ठेवले होते. या पत्रानुसार देवेश दत्ता पाथ्रीकर याने अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग करीत असल्याचे म्हटले होते. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी पाथ्रीकरला अटक आली. पोलिसांनी कीटकनाशकाचा रिकामा डबा वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला. श्वेताने स्वत:च्या हस्ताक्षरात वहीत लिहिलेले पत्र पोलिसांनी मृत्युपूर्व जबाब म्हणून रजिस्टर करून हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवले. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालानुसार मृत्युपूर्वी लिहिलेले सात पानी पत्र पोलिसांनी आरोपी पाथ्रीकरविरोधात दोषारोपपत्र म्हणून न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी श्वेताने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, ते न्यायालयासमोर ठेवले व आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी न्यायालयास विनंती केली. श्वेताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपी पाथ्रीकरला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. हर्षल निबंळकर व अ‍ॅड. राजेंद्र मुगदिया यांनी या खटल्यात १० साक्षीदार तपासले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three years jail for shweta borse suside case
First published on: 16-01-2013 at 03:00 IST