scorecardresearch

Premium

अल्पवयीन मुलीवर चुलत्याचा बलात्कार

पाचगाव (ता.करवीर) येथील अल्पवयीन मुलीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या आईने करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चुलता व मुलीच्या वडिलासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या वडिलासही अटक केली आहे.

पोलिसात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पाचगाव येथील पीडित मुलीचा वडील रखेलीसह अन्य ठिकाणी राहतो. पत्नीशी होणाऱ्या सततच्या वादामुळे त्याने पीडित मुलीला आपल्या भावाकडे ठेवले होते. याचा फायदा घेऊन चुलत्याने संबंधित मुलीवर १५ जुलै ते २९ ऑगस्ट या कालावधीत बलात्कार केला. या प्रकाराला त्याच्या पत्नीनेही मदत केली आहे. हा प्रकार मुलीच्या वडिलाला व त्याच्या रखेलीला माहीत होता. तरीही त्यांनी याबाबत कोणाला माहिती दिली नाही. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यावर तिने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित मुलीच्या वडिलास अटक करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uncle rapes minor girl

First published on: 03-09-2013 at 01:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×