आगामी आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक तयार करताना आयुक्त महेश पाठक यांनी शहरातील विकासकामांसाठी १,५८१ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यात पाणीपुरवठय़ासह विविध कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यंदा प्रथमच हेरिटेज सेलसाठी सात कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पीएमपी आणि शिक्षण मंडळांच्या खरेदीच्या सर्व निविदा यापुढे ऑनलाईन प्रक्रियेने स्वीकारण्याच्या योजनेचाही समावेश करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा: तरतूद २२३ कोटी
– खडकवासला ते पर्वती ते लष्कर केंद्रापर्यंत जलवाहिनी
– खडकवासला ते वारजे दरम्यान जलवाहिनी
– वारजे येथे नवे जलशुद्धीकरण केंद्र
– पर्वती येथे नवे जलशुद्धीकरण केंद्र
– भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना
सार्वजनिक वाहतूक: तरतूद ४८२ कोटी
– चौक, पदपथ, सायकल ट्रॅक सुधारणा
– दोन रेल्वे ओलांडणी पुलांचे रुंदीकरण
– वाहनतळांचा विकास, उड्डाणपूल बांधणी
– पीएमपीसाठी १०० नव्या गाडय़ांची खरेदी
– मेट्रोसाठी जागा संपादन कार्यक्रम
मलनिस्सारण: तरतूद ८४ कोटी
– राष्ट्रीय नदी सुधारणा कार्यक्रम राबवणार
– बाणेर, बालेवाडी परिसरात नव्या मलवाहिन्या
– मलनिस्सारणासाठी दोन स्वतंत्र पंिपग स्टेशन
– दहा ठिकाणी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र
घनकचरा व्यवस्थापन: तरतूद ६५ कोटी
– कचरा वर्गीकरणासाठी प्रबोधनावर भर
– ई-वेस्टसाठी स्वतंत्र व्यवस्था करणार
– बांधकाम व घरपाडी राडारोडय़ाची स्वतंत्र व्यवस्था
– ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प
आरोग्य विभाग: तरतूद २४ कोटी
– जन्म-मृत्यू रेकॉर्डचे संगणकीकरण
– ज्येष्ठ महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे
– मासळी विक्रीसाठी स्वतंत्र बाजार
– कुत्रा बंदोबस्त विभागाची स्थापना
नागरवस्ती विकास: तरतूद ३३ कोटी
– युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम
– युवक कल्याणकारी योजना
– बचत गटाच्या उत्पादनासाठी विक्री केंद्र
– युवतींना वाहन चालक परवाना प्रशिक्षण
– नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर
उद्यान विभाग: तरतूद ४७ कोटी
– शहरात अनेक उद्यानांचा विकास
– सारसबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची करणार
– पेशवे बाग येथील तळ्याचे सुशोभीकरण
– येरवडा येथे स्केटिंग िरग
– कात्रज तलावात ‘लेझर शो’ चे नियोजन
नेहरू योजना: तरतूद ३०९ कोटी
– नदी सुधारणा प्रकल्प
– शहरी गरिबांसाठी पक्की घरे
– विविध प्रकल्पांचे डीपीआर पूर्ण करणार
– शहरात ५२ किलोमीटरच्या बीआरटीचे काम