टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धाच्या पाठोपाठ महत्त्वाची स्पर्धा म्हणजे एटीपी फायनल्स. यंदा पुरुषांमध्ये या स्पर्धेचे अजिंक्यपद जर्मनीचा रशियन वंशाचा अलेक्झांडर झ्वेरेव याने पटकावले. हे करताना उपान्त्य फेरीत रॉजर फेडरर आणि अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविच यांना त्याने हरवून दाखवले! अवघ्या २१ वर्षांच्या अलेक्झांडर झ्वेरेवकडे भविष्यातला अजिंक्यवीर टेनिसपटू म्हणून पाहिले जाते. पण ‘भविष्या’पर्यंत वाट पाहण्याची फुरसत झ्वेरेवकडे नसावी, असे त्याच्या सध्याच्या कामगिरीकडे पाहून म्हणावेसे वाटते.

गेले दशकभर पुरुष टेनिस विश्वात रॉजर फेडरर, राफाएल नडाल, नोव्हाक जोकोविच आणि अ‍ॅण्डी मरे यांची सत्ता होती. यांतील पहिले दोघे अस्ताला निघाले म्हणावेत, तर गेल्या वर्षीच या दोघांनी दोन-दोन आणि या वर्षी पहिली दोन ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे आपसांत वाटून घेतली होती! यंदाच्या वर्षी उरलेल्या दोन स्पर्धा (विम्बल्डन आणि अमेरिकन) जोकोविचने जिंकल्या. अ‍ॅण्डी मरे सध्या जायबंदी असल्यामुळे खेळत नाही. अन्यथा या तिघांना आव्हान तोच देऊ शकतो अशी त्याची मधल्या काळातली कामगिरी होती. गेल्या काही वर्षांत हुआन मार्टिन डेल पोत्रो, मारिन चिलिच, स्टॅनिस्लाव्ह वॉवरिंका असे मोजके अपवाद सोडल्यास फेडरर-नाडाल-जोकोविच-मरे या चौकडीची सद्दी मोडून काढणे इतर कोणालाही शक्य झालेले नाही. अशा अघोषित मक्तेदारीच्या विश्वात झ्वेरेवचा उदय टेनिसरसिकांना आश्वासक वाटतो. लंडनमध्ये परवा एटीपी फायनल्सच्या उपान्त्य फेरीत झ्वेरेवने फेडररला हरवल्यानंतर फेडररप्रेमी प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली. मात्र फेडररविषयी झ्वेरेवला नितांत आदर आहे. वर्षांखेरची ही स्पर्धा जिंकणारा झ्वेरेव सर्वात युवा टेनिसपटू ठरला. यापूर्वी इतक्या लहान वयात ही स्पर्धा जिंकून दाखवण्याची करामत नोव्हाक जोकोविचने करून दाखवली होती! तसेच १९९५नंतर प्रथमच एखाद्या जर्मन टेनिसपटूने एटीपी फायनल्स जिंकली. झ्वेरेवच्या वाटचालीविषयी जर्मनीचा हा निष्णात माजी टेनिसपटू विलक्षण आशावादी आहे. झ्वेरेवचा सध्याचा प्रशिक्षक आहे इव्हान लेंडल. लेंडल हाही बेकरच्याच पिढीतला आणखी एक यशस्वी आणि बहुस्लॅम विजेता टेनिसपटू. साडेसहा फूट उंची आणि उत्तम फिटनेस यांना आत्मविश्वासाचे बळ लाभल्यामुळे झ्वेरेव टेनिसमधील सध्याच्या बडय़ा मनसबदारांसाठी आव्हानात्मक ठरू लागला आहे. त्याचा ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामधील आजवरचा रेकॉर्ड फार आशादायी नाही. पण ही परिस्थिती लवकरच बदलेल, याची चाहूल एटीपी फायनल्स स्पर्धेतून मिळालेली आहे.

Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श