ज्यांच्या संशोधनाने कर्करोगावर उपयोगी पडणारी औषधे तयार करता आली, पिकांचे संरक्षण सोपे झाले, इलेक्ट्रॉनिक यंत्रे अधिक प्रगत बनली त्या नोबेल पारितोषिक मानकरी रिचर्ड हेक यांचे निधन मानवी संवेदना शिल्लक असलेल्यांसाठी चटका लावणारे ठरले. एकेकाळी मानवी कल्याणासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या या बुद्धिमान वैज्ञानिकाची अखेर विपन्नावस्थेत झाली. त्यांना मूलबाळ नव्हते व आजारपणात त्यांचा बराच पसा संपला होता. सरतेशेवटी ते पुतण्याच्या निवृत्तिवेतनावर जगत होते. त्यांना अखेरीस उलटय़ा झाल्या असता रुग्णालयात नेण्यात आले, पण पसे नसल्यामुळे खासगी रुग्णालयांनी प्रवेश नाकारला. अखेर सरकारी रुग्णालयात नेले जाईपर्यंत त्यांची प्रकृती पार खालावली होती, त्यातच त्यांचे फिलिपिन्समधील मनिला येथे निधन झाले.

व्यावहारिक जगात बुद्धीपुढे पसा वरचढ ठरतो तो असा. २०१० मध्ये त्यांना जपानचे एइची नेगिशी व अकिरा सुझुकी यांच्यासमवेत रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले होते. त्यांनी कार्बन अणूंची जोडणी नव्या पद्धतीने केली, त्याचा उपयोग नंतर संगणकाचे पातळ पडदे, औषधे, कीटकनाशके अशा अनेक कारणांसाठी झाला. नॅप्रोक्झेन हे वेदनाशामक औषध त्यांच्या संशोधनामुळेच तयार करता आले. डीएनए क्रमवारी लावण्याच्या तंत्रातही त्यांचे संशोधन उपयुक्त आहे. हिक यांनी अमेरिकेतील डेलवेअर विद्यापीठात संशोधन करताना पॅलेडियम धातूचा उत्प्रेरक वापरून कार्बनी अणूंची वेगळी जोडणी करून मूलभूत काम केले; नंतर नेगिशी व सुझुकी यांनी या तंत्रात सुधारणा करून त्यापेक्षा सोपी अशी पॅलाडियम कॅटलाइज्ड क्रॉस कपिलग ही पद्धत शोधली होती. त्यांनी जी अभिक्रिया शोधली ती ‘हेक अभिक्रिया’ म्हणून ओळखली जाते. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेच्या मसॅच्युसेट्समधील िस्प्रगफील्ड या गावातील एका किरकोळ विक्रेत्याचे पुत्र असलेल्या रिचर्ड यांना कॅलिफोíनया विद्यापीठात आल्यानंतर आपल्याला पोषके व वनस्पतीतील रंगद्रव्यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. सॉल विनस्टेन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यावाचस्पती पदवी घेतली. समाज व संस्कृतीच्या उन्नतीसाठी आपण आयुष्य वाहून दिले असे ते सांगत, पण समाजाने मात्र त्यांना त्याची प्रचीती दिली नाही. त्यांना ग्लेसबोर्ग पदक व हर्बर्ट ब्राऊन पुरस्कार, व्ॉलेस कॅरोथर्स पुरस्कार हे सन्मान मिळाले होते. डेलावेअर विद्यापीठातून ते हॅिरग्टन अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.