News Flash

कोणती कार घेऊ?

समीर सर, मला होंडा ब्रियो, फोर्ड फिगो आणि टोयोटा लिवा यामध्ये कन्फ्युजन आहे.

| April 14, 2016 03:37 pm

* समीर सर, मला होंडा ब्रियो, फोर्ड फिगो आणि टोयोटा लिवा यामध्ये कन्फ्युजन आहे. माझे महिन्याचे ड्रायिव्हग ४०० किमीच्या दरम्यान आहे. मात्र या प्रवासात दोन छोटे घाट आहेत. अधिकाधिक प्रवास हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरून आहे. त्यासुसार परफॅारमन्स अधिक असलेली गाडी कोणती? होंडाला रिसेल व्हॅॅल्यू अधिक आहे असे ऐकले. मी प्रथमच कार घेत आहे. कृपया मार्गदर्शन करा.
-राजकुमार पाटील
* तुमचा रोजचा प्रवास जर कमी असेल तर तुम्ही पेट्रोलगाडी घ्यावी. तुम्ही ब्रियो घेतलीत तर चांगले ठरेल, परंतु त्या गाडीची पॉवर कमी आहे व खूप कमी उंचीची गाडी आहे. तुम्ही टाटा बोल्ट रिव्हट्रोन ही गाडी घ्यावी. त्यात अधिक पॉवर आहे आणि ही दणकट गाडी आहे किंवा मग ग्रॅण्ड आय१० या गाडीचा विचार करा.
* सर, मला एसयूव्ही घ्यायची आहे. माझे बजेट १६ लाख रुपये आहे. माझा रोजचा प्रवास १२ किमीचा असला तरी रस्ता खूप कच्चा आहे. मला लांबच्या प्रवासाला जाण्याचीही खूप आवड आहे. दोन्हीकडे वापरता येईल, अशी गाडी सुचवा. मला स्वत:ला मिहद्रा थार ही गाडी खूप आवडते. काय योग्य ठरेल ते सांगा.
– रामचंद्र गेंडेपुजारी, कोल्हापूर
* टाटा सफारी स्टॉर्म ही अतिशय दणकट व पॉवरफुल गाडी आहे, परंतु ती चालवताना खूप हेवी वाटते. तुम्ही टीयूव्ही ३०० किंवा एक्सयूव्ही ५०० यांचा विचार करावा. बजेटप्रमाणे यातील एका गाडीला प्राधान्य द्यावे.
* मला शेवल्रे बीटबद्दल रिव्हय़ू देऊ शकाल? ही कार कशी आहे – फायदे अन्य तोटे? किंमत किती आहे? धन्यवाद !
– प्रकाश सराफ
* शेवल्रे बीट ही उत्तम कार आहे आणि तिची किंमतही वॅगन आरपेक्षा कमी असून त्यात जागा प्रशस्त आहे. तसेच या गाडीचे सस्पेन्शन आणि कम्फर्टही उत्तम आहे. त्या कारमध्ये तुम्हाला तीन वर्षांची वॉरंटी आणि सíव्हसही मोफत दिली जाते. डिझेलमध्ये ती तुम्हाला मिळू शकेल आणि उत्तम परफॉर्मन्सही चांगला देते. ती तुम्हाला चार लाख ६० हजारांपर्यंत ऑन रोड मिळेल.
* मी शिक्षक आहे. मी रोज गंगाखेड ते मालकोली (ता. लोहा, जि. नांदेड) असा १२० किमीचा प्रवास करतो. मला डिझेलवर चालणारी हाय अ‍ॅव्हरेज कार हवी आहे. मला नवीन किंवा सेकंडहँड कोणतीही चालेल. माझे बजेट अडीच लाखांपर्यंत आहे.
– चंद्रकांत फड
* अडीच लाखांत तुम्हाला स्विफ्ट डिझेल व्हेरिएंट मिळू शकेल. सहा-सात वष्रे वापरलेली गाडी तुम्ही आरामात घेऊ शकता. मात्र, तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवावे, असा सल्ला मी देईन. कारण टोयोटाची इटिऑस लिवा तुम्हाला सेकंड हँडमध्ये तीन ते साडेतीन लाखांत मिळू शकते.
* नमस्कार मी कार खरेदी करू इच्छित आहे. मला आय२० अ‍ॅक्टिव्ह गाडी बरी वाटते आहे. माझे महिन्याला ५०० ते ७०० किमी रिनग आहे. शिवाय कुटुंबासोबत बाहेर प्रवास करणार आहे. सध्या बरीच नवीन मॉडेल्स आलेली आहेत. त्यामुळे मी संभ्रमात आहे. आय२० अ‍ॅक्टिव्हचा मी विचार करीत आहे. तरी मला कोणती गाडी योग्य होईल याबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती.
प्रभाकर इराशेट्टी
* आय२० अ‍ॅक्टिव्ह उत्तम गाडी आहेच, पण तिची किंमत खूपच जास्त आहे. एवढय़ा किमतीत तुम्हाला इकोस्पोर्ट एसयूव्ही मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही एक तर फोर्ड इकोस्पोर्ट घ्यावी किंवा फोर्ड फिगो, मारुती बालेनो घ्यावी. या तीनही गाडय़ा पसावसूल गाडय़ा आहेत.
* माझ्या कुटुंबात आम्ही पाच जण आहोत. मी डिझायर किंवा बालेनो यांपकी कोणती गाडी घ्यावी, याचे मार्गदर्शन करा.
 विनोद वाघ
* तुम्ही बालेनो ही कार घ्यावी. पाच लोकांसाठी डिझायरपेक्षा जास्त जागा त्यात तुम्हाला मिळते. मायलेजही जास्त आहे आणि किंमतही निव्वळ साडेपाच लाख रुपये आहे. त्यात तुम्हाला एबीएस आणि एअरबॅग्जही मिळतील.
* मला बालेनो घ्यायची आहे. मी मुंबईत राहतो आणि दररोज गाडीने ऑफिसला जातो. मात्र, मला स्वत:ची गाडी घ्यायची आहे. बालेनोबरोबरच एलिट आय२०, स्विफ्ट हॅच, ग्रँड आय१० या गाडय़ाही माझ्या नजरेसमोर आहेत. तुम्ही कोणती गाडी सुचवाल? बालेनो कशी वाटते?
राजेश पांचाळ
* बालेनो ही चांगली कार आहे; परंतु ती वजनाने हलकी आहे आणि ती मुंबईत फिरवायला ओके आहे. मात्र तुम्ही वीकेंडला जेव्हा बाहेर जाल तेव्हा आणि तुम्ही सातत्याने ती फिरवणार असाल तर हायवेला ती हलकी वाटते. तुम्ही खूप हेवी ड्रायिव्हग करणार असाल तर बालेनोपेक्षा आय२० एलिट ही गाडी उत्तम आहे.
* माझे बजेट साडेचार लाख रुपये आहे. मला तुम्ही कोणती यूज्ड कार सुचवाल आणि ती कुठे उपलब्ध असेल?
बी. एम. पाटील
* मी तुम्हाला टोयोटा इटिऑस ही डिझेल अथवा पेट्रोलवर चालणारी कार सुचवेन. ही गाडी उत्तम आहे आणि तिच्यासाठी टी परमिट उपलब्ध आहे.
* माझे ड्रायव्हिंग कच्चे आहे मी ऑटो गीअर कार घेऊ का? कार जुनी की नवीन घ्यावी? आठवडय़ातून एकदाच आम्ही गाडी बाहेर काढणार आहे.
सी राजन
* तुम्ही गाडीचा एवढा कमी वापर करत असाल तर तुम्ही ऑटो गीअरवरील आय१० ही चार-पाच वष्रे वापरलेली गाडी घेऊ शकता. ती तुम्हाला दोन-अडीच लाखांत मिळू शकते. ती कार तुमच्यासाठी योग्य ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 12:18 am

Web Title: car buying advice tips
टॅग : Car
Next Stories
1 बायकर्स अड्डा : पावसाळ्यातले बायकिंग..
2 न्युट्रल व्ह्य़ू : आदर्श रस्ता व्यवस्था
3 हरवत चाललेले ‘कार’नामे
Just Now!
X