आपल्याकडे चारचाकी हवीच असे स्वप्न बाळगणाऱ्यांच्या ड्रीम कार लिस्टमध्ये पहिल्या पाचांत मर्सडिीज असतेच असते. भले तिचा पसंतीक्रम इकडेतिकडे होईल. मर्सडिीज बाळगणे हे एक स्टेटस सिम्बॉल आहे. त्यामुळे मर्सडिीज घेण्याइतपत आíथक ताकद नसली तरी प्रत्येक कारप्रेमी मर्सडिीजचं कोणतं नवीन मॉडेल बाजारात आलंय इथपासून ते तिच्या जन्मकथेपर्यंत सगळी अप टू डेट माहिती बाळगून असतो. तर अशा या मर्सडिीजचे नुकतेच एक नवीन मॉडेल बाजारात आलंय, जीएलसी, भारतात बनलेली. भारतात बनलेली अशासाठी की या गाडीची निर्मिती मर्सडिीजच्या चाकण येथील प्लान्टमध्येच झाली आहे..

एखाद्याला मर्सडिीज घ्यायची असेल तर त्याला आधी बुकिंग करावे लागते, त्यानंतर गाडीच्या प्रत्यक्ष आगमनासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते. हा जो वाट पाहण्याचा कालावधी आहे, तो कमी व्हावा.. किंबहुना ग्राहकाला कमीत कमी वेळात त्याच्या आवडीचे मर्सडिीज मॉडेल उपलब्ध व्हावे या उद्देशाने चाकण येथे मर्सडिीजने प्रकल्प स्थापन केला.

एक हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात आता मर्सडिीजची अनेक मॉडेल्स तयार होऊ लागली आहेत. त्यातीलच एक अलीकडेच लाँच झालेले मॉडेल म्हणजे जीएलसी. मध्यम आकारातल्या एसयूव्ही सेगमेंटमधली..

कुठे टोकदार वळणं, कुठे सरळ रस्ता, कुठे तीव्र उतार तर कुठे चढण, मध्येच घाट.. अशा मुंबई-नाशिक हायवेवर थेट नाशिकपर्यंत जीएलसी चालवण्याचा अनुभव नुकताच घेता आला. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही प्रकारांत चालवता येण्याजोग्या असलेल्या जीएलसीचा हा ड्रायिव्हग अनुभव आनंददायक होता.

बारूप

या नव्या मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा लूक अगदी भारदस्त आहे. गाडीच्या लुकमध्ये रेडिएटर ट्रीम आणि मॅट इरिडियम सिल्व्हर या दोन लोव्हर्स क्रोम्स इनसर्ट देण्यात आल्या आहेत. पुढील बाजूला एका छोटय़ा आणि आटोपशीर ओव्हरहँगसह तीन बाजूंचे रेडिएटर ग्रिल ट्विन लोव्हर आहेत आणि त्यांच्या केंद्रस्थानी मर्सडिीजचे बोधचिन्ह दिमाखात विराजमान आहे. चमकदार एलईडी दिवे गाडीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. स्प्लिट एलईडी रिअर लॅम्प्समध्ये एक खास नाइट डिझाइनही आहे. बारूप एसयूव्हीचे खरे व्यक्तिमत्त्व दाखवते आणि त्यात आकर्षक अ‍ॅल्युमिनियम लुक रबर स्टड्ससोबत सुंदर दिसतो. जीएलसीमध्ये १८ इंचाचे पाच स्पोक अलॉय व्हील्स आहेत, ज्यामुळे एसयूव्हीच्या स्पोर्टी लुकमध्ये भर पडते.

अंतरंग

जीएलसीमध्ये काही खास अंतर्गत रचना करण्यात आली आहे. त्यातून मर्सडिीज गुणवत्तेच्या बाबतीत किती आग्रही असते हेच अधोरेखित होते. चालकासाठी अ‍ॅडजस्टेबल सीट तर आहेच शिवाय त्याच्या शेजारी बसणाऱ्यालाही तशीच आसन व्यवस्था देण्यात आली आहे. तसेच दरवाजाच्या बाजूला सीट मागेपुढे करण्यासाठी विशिष्ट पुश बटन देण्यात आले आहे. त्याच्याच बाजूला मेमरी बटनही आहे. म्हणजे समजा तुम्ही चालकाशेजारील आसनावर बसला असाल आणि तुम्ही तुम्हाला हवी तशी आसनाची रचना करून घेतली आणि ती मेमरीत फीड केली तर तुमच्या जागी कोणीही बसला असेल आणि त्याने त्याच्या मर्जीनुसार सीटची रचना बदलली असेल तर तुम्ही परत तुमच्या आसनावर स्थानापन्न झाल्यास तुम्ही मेमरीत फीड केल्याप्रमाणे सीटची रचना बदलते. याशिवाय पॅनोरमा टॉप स्लायिडग इलेक्ट्रिक छत, स्टोअरेज पॅकेज ज्यात कुलूपबंद करण्यायोग्य कार्गो फ्लोअर आहे, १२ व्ही प्लग सॉकेट, रंगांच्या तीन पर्यायांसह भरपूर प्रकाश, डोअर सिल पॅनल्स प्रकाशित मर्सडिीज बेन्स अक्षरांसह, एक लेदर कव्हर केलेले पॅनल, कीलेस स्टाìटग फंक्शन, मागील सीट्सवर सन ब्लाइंड्स आणि रिव्हìसग कॅमेऱ्यासह अ‍ॅक्टिव्ह पाìकग असिस्टन्सही आहे. भरपूर जागा असलेल्या जीएलसीमध्ये पाच जण अगदी आरामात बसू शकतात.  प्रवासी व सामानासाठी जीएलसीमध्ये भरपूर जागा देण्यात आली आहे. कार्गो बार्समागील सीटच्या बॅकरेस्टच्या मागे देण्यात आले आहेत, ज्यातून सामानाची जागा ३० लिटरने वाढली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीएलसीच्या पुढील बाजूस दोन एअरबॅग्ज, मागील बाजूस दोन, पडद्याच्या एअरबॅग्ज आणि ड्रायिव्हग सीटला नी बॅग अशा सात एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. जीएलसी ऑटोमॅटिकमध्ये तब्बल नऊ गिअर्स देण्यात आले आहेत, तर मॅन्युअल गिअर ट्रान्समिशनचे सात गिअर्स आहेत.

इंजिन

जीएलसीचे पेट्रोल आणि डिझेल अशी दोन मॉडेल आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये ११९१ सीसीचे इंजिन आहे तर डिझेल इंजिनात २१४३ सीसी क्षमतेचे इंजिन आहे. शक्तिशाली इंजिनांमुळे गाडी क्षणार्धात प्रचंड वेग घेऊ शकते.

चालवण्याचा अनुभव

नाशिक हायवेवर तीव्र वळणे, चढ-उतार आणि घाट अशा प्रकारचे रस्ते आहेत. अगदी टॉप स्पीडलाही या रस्त्यावर गाडी कंट्रोल करता आली. शक्तिशाली इंजिनांमुळे जीएलसी अगदी साडेसहा सेकंदांत शून्य ते १०० किमी प्रति तास एवढा वेग गाठू शकते. कम्फर्ट, इको, स्पोर्ट, स्पोर्स प्लस आणि वैयक्तिक असे पाच ड्रायिव्हग मोड्स जीएलसीमध्ये आहेत. प्रत्येक ड्रायिव्हग मोडसाठी इंजिनाची कामगिरी, पॉवर ट्रान्समिशन, स्टीअिरग, क्लायमेट कंट्रोल वेगवेगळ्या स्वरूपातील फंक्शन्स देण्यात आले आहेत. ऑफ रोड प्रकारासाठीही जीएलसी उपलब्ध आहे. मात्र, तिच्या रचनेत थोडा बदल करण्यात आला आहे. ऑफ रोड ड्रायिव्हगसाठी उपलब्ध असलेली जीएलसी चालवताना ती २० मिमीपर्यंत वर उचलता येते. या प्रकारात ऑफ रोड, इन्क्लाइन आणि स्लिपरी असे तीन ड्रायिव्हग मोड्स आहेत.

गाडी पंक्चर झाल्यास

गाडी पंक्चर होण्याचा कटू अनुभव कोणालाही नको असतो. पंक्चर झाली की सर्व सव्यापसव्य करावे लागतात. अगदी दुसरे टायर लावण्यापासून ते गॅरेजची शोधाशोध करेपर्यंत. जीएलसीबाबत हा अनुभव आला. कसारा घाटाच्या अलीकडेच जीएलसीच्या मागच्या टायरने राम म्हटले. मात्र, यावरही मर्सडिीजने उपाय शोधून ठेवला आहे. गाडीच्या डिकीमध्ये सर्व टूल्स उपलब्ध असतात. त्यात सर्वात महत्त्वाचा टूल म्हणजे मोटार पंप. हा पंप पंक्चर झालेल्या टायरला जोडला की त्याने टायरमध्ये हवा भरली जाते. आणि तुम्ही किमान गॅरेजपर्यंत पोहोचू शकाल एवढी सोय होते. अगदीच टायरमध्ये हवा भरली गेली नाहीच तर स्टेपनी आहे. परंतु त्यातही एक मेख आहे. आणि ती म्हणजे तुम्ही त्या टायरच्या आधारावर फक्त शंभरएक किमीपर्यंतच प्रवास करू शकता. तसंच यादरम्यान तुमच्या गाडीचा वेग ताशी ८० ते १०० किमीच्या पुढे गेला तर टायर फुटलेच म्हणून समजा. आमच्या सुदैवाने गॅरेज अवघ्या काही किमीवरच होते. त्यामुळे मोटार पंपाने हवा भरून गॅरेजपर्यंत नेली आणि दुरुस्ती करून पुढे मार्गस्थ झालो.

स्पर्धा कोणाशी

  • ऑडी क्यू५
  • बीएमडब्ल्यू एक्स३

किंमत

जीएलसी २२० डीफोरमॅटिक्सची किंमत ४७ लाख ९० हजार रुपये असून स्पोर्ट्स मॉडेल ५१ लाख ५० हजार तर जीएलसी ३०० फोरमॅटिक्स स्पोर्ट्सची किंमत ५१ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. सर्व किमती एक्स शोरूम्स आहेत.

vinay.upasani@expressindia.com