08 March 2021

News Flash

टेस्ट ड्राइव्ह : मोजो महिमा

मिहद्राची मोजो ही ३०० सीसीची स्पोर्टस बाइक यंदा रस्त्यावर आली.

अनेक स्पोर्टस् बाइकच्या भाऊगर्दीत आता मिहद्राची मोजोही दाखल झाली आहे. मोजो चालवताना तिचा महिमा लक्षात आला. एक भन्नाट गाडी चालवण्याचा हा अनुभव तुमच्याशी शेअर करायला आनंद होतोय..

मिहद्राची मोजो ही ३०० सीसीची स्पोर्टस बाइक यंदा रस्त्यावर आली. स्पोर्टस् बाइकच्या प्रेमात असलेल्यांसाठी ही मोठीच पर्वणी होती. तर अशा या मोजोच्या ड्रायिव्हगचा आनंद लुटण्याचा अनुभव नुकताच घेता आला. शहरात अगदी सहज सफाईदारपणे मोजोवर स्वार होता येते, मग तिच्यावर कितीही वजन असो, मोजो त्याची तमा न बाळगता सहजपणे फिरते. वळणावरही ती सहजगत्या वळते. फारसा जोर लावावा लागत नाही, आणि तिचा रेडिअस लहान असूनही हे सहज शक्य होते. चिंचोळ्या जागेतूनही मोजो जाऊ शकते आणि वाहतूककोंडीतही तिचा आब राखून चालते. फक्त एकच गोष्ट मला खटकली आणि ती म्हणजे बाइक फार लवकर गरम होते.

उन्हाळ्यात या गोष्टीचा त्रास जाणवू शकतो, अन्यथा इतर ऋतूंमध्ये मोजो खरंच अगदी कट्टर बाइकप्रेमीला हवी अगदी तश्शीच आहे. आणखी एक ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे मोजोचा गीअरबॉक्स. गाडीचे गीअर शििफ्टग जेवढे स्मूद असायला हवे, तसे मोजोचे नाहीत. जेव्हा तुम्हाला ट्रॅफिकमध्ये सारखेसारखे गीअर बदलावे लागतात त्यावेळी ही गोष्ट प्रकर्षांने जाणवते. गीअर शििफ्टग थोडे हार्डच आहे. मिहद्राने यावर थोडे लक्ष देण्याची गरज आहे.

डिझाइन आणि स्टाइल

याबाबतीत मोजो खरंच भाव खाऊन जाते. हिच्या हेडलाइट्सपासूनच सुरुवात करू या. तुम्ही जर ट्रायम्फ पाहिली असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की मोजोचे दोन्ही हेडलाइसट्सही अगदी हुबेहूब तस्सेच आहेत. हिचे फ्रण्ट फोर्क आणि िस्वग आर्म यांना सोनेरी रंग देण्यात आला आहे. कारण त्यामुळे बाइकच्या दिसण्यात आकर्षकता निर्माण झाली आहे. मोजोचे ट्विन एक्झॉस्ट डिझाइनही अगदी प्रथम श्रेणीच्या दर्जाचे आहेत. रेडिएटरच्या भोवती असलेल िवड डिफ्लेक्टर मोजोच्या सौंदर्यात भरच घालतात. हिची इंधनटाकीही तेवढीच आकर्षक आहे. डिझाइन आणि स्टाइलच्या बाबतीत मोजो चांगलीच आहे.

इन्स्ट्रमेंट कन्सोल

इंडिकेशन मीटर्स ही कोणत्याही बाइकच्या स्टाइलची ओळख असते. रॉयल एन्फिल्डवाल्यांनी याकडे दुर्लक्ष केले असले तरी टी मिहद्राने मात्र इन्स्ट्रमेंट कन्सोलकडे बारकाईने लक्ष दिले आहे. एॅनालॉग टेकोमीटर गाडीच्या डाव्या बाजूला देण्यात आले असून डिजिटल डिस्प्ले त्याच्या उजव्या बाजूला आहे. मोजोवरील डिस्प्लेमध्ये ओडोमीटर, स्पीडोमीटर, ट्रिप मीटर आणि फ्युएल इंडिकेटर आिदचा समावेश आहे. विशेष म्हणजे इन्स्ट्रमेंट कन्सोलमध्ये शून्य ते १०० किमी प्रतितास वेगाची मोजमाप करणारा टायमरचा समावेश असून गाडीचा उच्चवेग किती होता, याचीही मोजमाप करणारे यंत्र त्यावर बसवण्यात आले आहे. उत्तम डायमेन्शन्समुळे इन्स्ट्रमेंट कन्सोल एकंदर खूप सुंदर आहे.

रायिडगचा अनुभव

बाइकस्वाराला बसताना आणि गाडी चालवताना कोणतीही अडचण जाणवू नये यासाठी मोजोचे हँडलबार नीट एॅडजस्ट करण्यात आले आहेत. तसेच गाडीचे सस्पेन्शन चांगले असल्याने रायिडग त्रासदायक वाटत नाही. गाडी चालवताना शीणवटा जाणवत नाही शिवाय गाडीच्या इंजिनाचे तापलेपण रेडिएटर्सच्या भोवती असलेल्या डिफ्लेक्टर्समुळे तितकेसे लक्षात येत नाही. रायडर आरामात गाडीवर बसू शकतो मात्र त्याच्या मागे बसणाऱ्याला खूप अडचणीचे वाटते. कारण मागील सीट खूपच लहान आणि त्याला बॅकरेस्टही देण्यात आलेला नाही. त्यामुळे लांबच्या प्रवासात मोजो रायडरच्या मागे बसणा-याला पाठीचा त्रास जाणवू शकतो. गाडला पिरेली टायर लावण्यात आले आहेत. त्यामुळे टायर रस्त्यावरील ग्रीप सोडत नाहीत. त्यामुळे गाडी घसरण्याचा धोका अगदीच नगण्य आहे.

इंजिन आणि गीअरबॉक्स

मिहद्राने मोजोला ३०० सीसीचे इंजिन बसवले आहे आणि ते लिक्विड कूल्ड व फ्युएल इंजेक्टेड आहे. ताकदवान इंजिन प्रचंड वेगाची निर्मिती करते. गीअरबॉक्समध्ये सहा गीअर्सचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही टॉप स्पीडला गाडी चालवली तर हवेत उडाल्याची अनुभूती मिळते. गाडीचा टॉप स्पीड १५५ किमी प्रतितास एवढा आहे. इंजिन खूप रिफाइन्ड आहे परंतु गीअर शििफ्टग करताना त्याचातील हार्डनेस जाणवतो.

सस्पेन्शन

मोजोचे सस्पेन्शन चांगले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर ही गाडी अगदी आरामात पळू शकते. हिचा ग्राऊंड क्लिअरन्सही १७३ मिमी आहे तर संपूर्ण गाडीचे वजन १६५ किलोग्रॅम एवढे आहे.

ब्रेक्स

मोजोचे पुढील ब्रेक्स ३२० मिमीचे डिस्क ब्रेक आहेत जे स्पोर्ट्स बाइक गटातील सर्वात मोठे आहेत आणि मागील ब्रेक्स २४० मिमीचे आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की मिहद्राने मोजोवरील स्वाराच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एबीएसची अनुपलब्धता प्रकर्षांने जाणवते परंतु मोजोचे एबीएस व्हर्जन लवकरच बाजारात येणार असल्याचे समजते.

मायलेज

कोणतेही नवीन वाहन बाजारात आले की किती मायलेज देणार, हा हमखास विचारला जाणारा अगदी बेसिक प्रश्न आहे. साहजिकच तो मोजोलाही लागू होतो. मोजो ही स्पोर्ट्स बाइक असल्याने हिचा मायलेज ३० किमी प्रतिलिटर एवढा आहे. शहरात हा मायलेज २५ किमी प्रतिलिटर एवढा घसरू शकतो तर हायवेला हाच मायलेज ३५पर्यंत जाऊ शकतो. मोजोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हिची भलीमोठी इंधन टाकी. या टाकीत तब्बल २१ लिटर पेट्रोल बसू शकते. त्यामुळे मोजोच्या एका राइडमध्ये तुम्ही सव्वापाचशे किमीचे अंतर कापू शकता, कुठेही पेट्रोल न भरता. तुम्हाला मायलेज नको असेल आणि निव्वळ वेग हवा असेल तर मोजो त्यातही तुमची साथ देते. अगदी साडेनऊ सेकंदात ती शून्य ते १०० किमी प्रतितास एवढा प्रचंड वेग गाठू शकते.

किंमत

पहिल्या दोन रंगांच्या मोजोंना सोनेरी रंगाच्या रिड्स आहेत. मोजोची एक्स शोरूम किंमत एक लाख ६० हजार रुपये एवढी आहे.

jaideep.bhopale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 12:26 am

Web Title: mojo mahindra sport bike
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 न्युट्रल व्ह्य़ू : चेंज? अच्छा है!
3 ऑटो न्यूज.. : फियाट अ‍ॅव्हेंच्युरा अर्बन क्रॉस
Just Now!
X