* सर, मला फॅमिली कार घ्यायची आहे. पाच ते सहा व्यक्ती बसू शकतील, अशी पेट्रोलवर चालणारी किंवा सीएनजीवर चालणारी गाडी हवी आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– मोहित पाटील

* पेट्रोल आणि सीएनजी अशी पाच-सहा जणांसाठीची कार म्हणजे अर्टगिा व्हीएक्सआय सीएनजी ही उत्तम कार आहे. मात्र, मागच्या बाजूला दोन माणसांना जरा आखडून बसावे लागेल आणि या गाडीची किंमतही जास्त आहे.
* मी एक शिक्षक असून मला दररोज किमान ५० किमीपर्यंत तरी फिरावे लागते. खेडोपाडी जावे लागते. मला स्विफ्ट डिझायर ही गाडी घेण्याची खूप इच्छा आहे. कितपत योग्य आहे ही गाडी घेणे.
– राजेश देशपांडे
* तुमचा रोजचा प्रवास खडबडीत रस्त्यांवरून होत असेल तर सेडान कारमध्ये तुमची पाठ खूप दुखू शकते. तुम्ही फोर्ड इकोस्पोर्ट घ्यावी किंवा मिहद्रा टीयूव्ही ३०० या गाडीचा विचार करावा.
* मी गेली ९/१० वष्रे चारचाकी वापरत आहे. पूर्वी मी इंडिगो सीएस वापरत होतो. २०१० साली स्विफ्ट डिझायर घेतली. ती आजपावेतो वापरत आहे. आता रिनग १२८७८९ किमी झाले आहे. आता ही डिझेल गाडी बदलावी, असा विचार आहे. कारण मेन्टेनन्स वाढत आहे. रु.१३ लाखापर्यंत दुसरी कोणती गाडी आपण सुचवाल.
– प्रकाश महागांवकर
* १३ लाख रुपयांत तुम्ही जर डिझेल सेडान कार बघत असाल तर नक्कीच फोक्सवॅगन व्हेन्टो टीडीआय ही गाडी घ्या. परंतु तुम्हाला जर एसयूव्ही हवी असेल तर फोर्ड इकोस्पोर्ट टीडीसीआय ही गाडी घ्यावी. या गाडीचा मायलेज २२ किमी प्रतिलिटर असा आहे तसेच इंजिनही पॉवरफुल आहे.
* मला तीन लाख रुपयांत गाडी घ्यायची आहे. कृपया मला रेंजमध्ये येणारी गाडी सुचवा. तसेच टाटा नॅनोचे सीएनजी मॉडेल हा एक चांगला पर्याय आहे का, हेही सांगा. इतरही पर्याय सुचवा.
– लेखा तोरसकर
* मी तुम्हाला तुमचे बजेट थोडे वाढवायला सांगेन आणि मारुती अल्टो सीएनजी ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी खूप चांगली असून तिचा मेन्टेनन्सही कमी आहे.

समीर ओक
ls.driveit@gmail.com