माझे बजेट १० ते १२ लाख आहे. ब्रेझ्झा, एस क्रॉस, सियाझ यापैकी कोणती कार घ्यावी. वापर शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे आहे.

साऊ जगताप

तुम्ही सियाझ घ्यावी. ही गाडी आलिशान दिसतेच आणि आरामदायीही आहे. तसेच मायलेजही उत्तम आहे.

मला फॅमिली कार घ्यायची असून बजेट आठ लाख रुपये आहे. मी टाटा टिगोर पेट्रोलचा विचार करत आहे. कृपया मार्गदर्शन करा.

जयकुमार सोमवंशी

आठ लाख जर बजेट असेल तर तुम्ही नक्कीच टाटा नेक्सॉन घ्यावी. ही गाडी मोठी असून प्रचंड आरामदायीपणा या गाडीत आहे; पण पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही फोक्सवॅगन अ‍ॅमियोचा विचार केला तर उत्तम ठरेल.

आम्ही पती आणि पत्नी नोकरीनिमित्त कायम बाहेरगावी प्रवास करतो. प्रवास जवळपास १५०० किमीच्या दरम्यान आहे. पेट्रोल आवृत्तीतील ऑटोमॅटिक गिअर असलेली कार सुचवा.

दीपक भालेराव

तुम्ही स्विफ्ट डिझायर व्हीएक्सआय एएमटी कार घ्या. ही ७.४० लाखांत अतिशय उत्तम कार आहे. मायलेजही २० चे मिळते. मात्र आपले रनिंग थोडे जास्त असल्याने आपण शक्यतो डिझेल एएमटी घ्यावी.

मला मारुती स्विफ्ट किंवा टोयोटा गाडी घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

प्रशांत भुसारी

मारुती स्विफ्ट ही उत्तम पैसे वसूल करणारी गाडी आहे. तुम्ही ती घ्यावी. थोडे बजेट जास्त असेल तर फोक्सवॅगन पोलो घ्यावी.

माझा रोजचा प्रवास १५० किलोमीटर आहे. तसेच तो १०० किमी महामार्गावर आहे. माझे बजेट ८ ते ९ लाख असून, मला माझ्या कुटुंबासाठीही कार घ्यायची आहे. माझ्या कुटुंबामध्ये ८ सदस्य आहेत. तरी मी कोणती कार घ्यावी? मायलेज अधिक आणि मेंटेनन्स कमी असावा. सेकंड हँड की नवीन कार घ्यावी याबाबत कृपया मार्गदर्शन करा.

शिवशंकर मलिशे, लातूर

तुमचे इतके रनिंग असेल तर तुम्ही ८ ते ९ लाखांत फोर्ड इकोस्पोर्ट डिझेल घ्यावी. ८ लोकांसाठी कार हवी असेल तर बजेट वाढवून टाटा हेक्सा उत्तम ठरेल.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com