या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे बजेट पाच ते सात लाखांचे आहे. मला माझ्या कुटुंबासाठी नवीन कार घ्यायची आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ५०० किमीपेक्षा जास्त नसेल. 

जावेद पठाण, बुलडाणा

तुम्ही मारुती डिझायर किंवा फोर्ड अस्पायर या गाडय़ांना प्राधान्य द्या.

फोक्सव्ॉगन पोलो ही गाडी तुम्हाला कशी वाटते.

गिरिश जे.

ही गाडी शहर आणि मध्यम हायवेवर चांगली आहे कारण तिचा मायलेज आणि पॉवर चांगले आहेत. सर्व प्रकारच्या हॅचबॅकमध्ये या गाडीतील सेफ्टी फीचर्स चांगले आहेत. एकच वाईट आहे, या गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स तितकासा चांगला नाही.

होंडा बीआर आणि टाटा हेक्झा यांपैकी कोणत्या गाडीची निवड करू.

तेजस षण्मुख

टोयोटाने सध्या तरी मध्यम बजेटची एसयूव्ही आणलेली नाही. परंतु तुम्ही नक्कीच मारुती सुझुकी क्रॉस किंवा ह्य़ुंडाई क्रेटा यांपैकी एकीची निवड करावी. ह्य़ुंडाईची सव्‍‌र्हिस चांगली आहे.

माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. व्ॉगन आर व्हीएक्सआय घेऊ की आणखी दुसरी कुठली गाडी घेऊ. माझे मासिक ड्रायव्हिंग साधारणत ३०० किमी असेल.

प्रवीण, तळेगाव

व्ॉगन आर आता जरा आऊटडेटेड झाली आहे. तुम्ही १२०० सीसीची डॅटसन गो घ्यावी किंवा टाटा टियागो अथवा मारुती इग्निसचा पर्यायही चांगला आहे.

स्कोडा फाबिया एलिगन्स ही गाडी मला फार आवडते. मला ही गाडी सेकंड हँड प्रकारात घ्यायला आवडेल. मला तुम्ही सांगा माझा निर्णय बरोबर आहे की चूक.

अमित पांढरे

होय, तुम्हाला स्कोडा फाबिया दोन लाखांत मिळेल परंतु कृपा करून ती नीट पारखून घ्या. कारण हिचा मेन्टेनन्स आणि तिचे सुटे भाग हे दोन्ही महाग आहे.

माझ्या कुटुंबात एकूण सहा जण आहेत. आमच्या कुटुंबाचा स्थानिक व्यवसाय आहे. आम्हाला नैमित्तिक वापरासाठी एकाचवेळी  गाडीत पाच-सहा जण बसू शकतील, अशी गाडी हवी आहे. आमचे बजेट सहा ते आठ लाख रुपये आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

अतुल देशपांडे, सोलापूर

केयूव्ही१००ची तुलना एसयूव्हीशीच होऊ शकते. तुम्ही त्याच रेंजमध्ये टीयूव्ही३०० घ्यावी. ती तुम्हाला आठ लाख रुपयांत मिळेल. ही गाडी जास्त ताकदीची आणि जास्त स्पेशियस आहे. नाहीच तर मग अर्टिगा पेट्रोल घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car to buy car tips advice
First published on: 07-07-2017 at 00:57 IST