काहीही मनापासून करायचं असेल, तर त्यासाठी वयाचा अडसर कधीच येत नाही, असं म्हणतात. नवीन काही करण्याच्या इच्छेबरोबरच मनात जिद्द असेल, तर अगदी वयाची शंभरी उलटून गेल्यावरही काहीही करता येतं. याचं एक उदाहरण म्हणजे वाराणसीमधल्या १०२ वर्षांच्या कलावती आजी! सध्या कलावती आजींचं नाव देशभरात समाजमाध्यमांवर चर्चिलं जातंय. कारण त्या या वयात मॅरेथॉन धावण्याचा सराव करताहेत. विशेष म्हणजे त्या फक्त स्वत:साठीच धावत नाहीयेत, तर देशात क्रीडा संस्कृतीचा प्रसार व्हावा, खेळांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हे करताहेत.

ज्या वयात एक एक पाऊल टाकण्याबद्दलही व्यक्तींना विचार करावा लागतो, त्या वयात कलावती आजी रोज पहाटे उठून धावण्याची प्रॅक्टिस करतात. आणि हो, धावण्याचा त्यांचा पोशाखही अगदी ‘स्पेशल’ आहे. पारंपरिक साडी आणि त्यावर धावण्याचे शूज घालून कलावती आजी न चुकता, न थकता रोज सकाळी घराबाहेर धावण्याचा सराव करतात. काशीमध्ये १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या दरम्यान ‘संसद खेल प्रतियोगिता २०२३’ या स्पर्धा होत आहेत. यामधील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कलावती आजींनी भाग घेतला आहे.

Gold coins uk
किचनचे नुतनीकरण करताना मिळालं घबाड; १७ व्या शतकातील नाण्यांच्या लिलावातून मिळाले लाखो रुपये
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

हेही वाचा… नातेसंबंध: डिझायनर बेबी मिळाली तर?

खरंतर तुमच्या-माझ्या घरातल्या आजीसारखीच ही आजी. १९२१ मध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कलावती आजींचं लग्न त्या वेळच्या पध्दतीप्रमाणे वयाच्या १० व्या वर्षीच झालं होतं. मूल होत नसल्याचा ठपका ठेवत त्यांचं लग्न मोडलं. २० वर्षांचा संसार झाल्यानंतर त्या माहेरी वडील आणि भावाबरोबर परत आल्या. माहेरच्यांवर आपलं ओझं होऊ नये अशी इच्छा मनात होती. त्यासाठी कलावतींनी वाराणसीतल्या शिवपुरीमध्ये असलेली १५ एकर जमीन सांभाळायला सुरुवात केली. खरंतर ६० च्या दशकात एकटी स्त्री शेतीची कामं करतीये ही गोष्ट काही सर्वसाधारण मानली जात नव्हती. पण शेतीची सगळी कामं करत कलावतींनी तो डोलारा सांभाळलाच, शिवाय आरोग्यही सांभाळलं. त्यांचा सकाळचा फेरफटका चुकत नाही. शेतीतली अंगमेहनतीची कामं करत असल्यानं त्यांना अन्य कोणत्या व्यायामाची कधी गरजच भासत नव्हती. वयाच्या ९० व्या वर्षी कलावती आजींना त्यांच्या भाच्यानं शेतीच्या कामातून निवृत्त होण्यास सुचवलं. त्यानंतरही आजींनी इतर वृध्दांसारखं घरात बसण्याऐवजी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि मग सकाळी चालणं आणि नंतर काही काळानं धावणं सुरु केलं.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: त्रासदायक डोकेदुखी

कलावती आजींच्या फिटनेसचं रहस्य आहे त्यांची साधी-सोपी जीवनशैली. पहाटे पाच वाजता उठून त्या त्यांच्या घराशेजारच्या मैदानात धावायला जातात. परत आल्यानंतर आंघोळ करुन सकाळी सात वाजता चहा घेतात. त्यानंतर काही वेळानं फळं खातात. सकाळी ११ वाजता जेवण करतात आणि रात्रीचं जेवणही संध्याकाळी साडेसात वाजता करतात. दिवसातून दोनदा ध्यान करतात. संध्याकाळच्या जेवणानंतर काहीही खात नाहीत, जेवणाआधी काहीतरी हलकं खातात. हलका आणि वेळेवर केलेला आहार, नियमित व्यायाम यामुळे कलावती आजी वयाची शंभरी उलटली तरी आपला फिटनेस टिकवून आहेत. आजी आजही दिवसातून एकदातरी संपूर्ण पायऱ्या चढून गच्चीवर जातात, असं त्यांची सून सांगते. त्यांचा हा फिटनेस आणि धावण्याची आवड बघूनच घरच्यांनी त्यांचं नाव मॅरेथॉनमध्ये घातलं. ६० वर्षांवरील गटामध्ये कलावती आजी धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका स्टेडियमच्या भूमीपूजनासाठी आले होते, त्या वेळेस त्यांचं भाषण ऐकून कलावती आजी प्रेरित झाल्या आणि मग त्यांनी धावणं अधिक गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली, असं त्या सांगतात.

हेही वाचा… समुपदेशन: नोकरी – कटू आठवणी किती दिवस सांभाळणार?

आपल्यापेक्षा आपल्या आधीची पिढी बळकट होती असं म्हणतात, ते कलावती आजींच्या उदाहऱणावरून पटतं. नवऱ्याच्या घरून परत आलेली स्त्री म्हणून त्या रडत बसल्या नाहीत हे विशेष. माहेरचा भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला. स्त्री म्हणून अंगमेहनतीची कामं करायला मागे हटल्या नाहीत, तर संकटांचा सामना करत त्याचं संधीत रुपांतर केलं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपलं आरोग्य उत्तम सांभाळलं आणि आजही त्यांची जिद्द कायम आहे. कामामध्ये आणि ताणामध्ये बुडवून घेत आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आताच्या पिढीतल्या अनेकांना कलावती आजींकडून आरोग्यरक्षणाचा धडा घेण्यासारखा आहे!