आराधना जोशी 

शाळेतून आल्यावर घरी उजळणीसाठी करावयाचा अभ्यास म्हणजेच गृहपाठ. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला हा होमवर्क दिला जातो. खूपच कमी शाळा अशा आहेत जिथे होमवर्क दिला जात नाही. पण बाकी मुलांसाठी होमवर्क करणे आणि पालकांसाठी मुलांकडून तो करून घेणं हा एक मोठा टास्कच असतो. मुळात होमवर्क म्हणजे फक्त शाळेतलाच अभ्यास नव्हे, मग नेमका काय? हे समजून घेण्याची गरज आहे. तान्ह्या बाळापासूनच या होमवर्कची सुरुवात होत असते, हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. तान्ह्या बाळाच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक हालचाली, घडामोडी, मोठ्यांचं बोलणं, वागणं या सगळ्या गोष्टी होमवर्कच्या कक्षेत येणाऱ्या असतात; पण आपण मात्र त्याकडे फार गांभीर्याने बघत नाही.

Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन

शाळेत जाण्याआधी घरातच शिकता येणाऱ्या अनेक गोष्टी पालक बाळांना शिकवत असतात. त्यात मातृभाषेतून होणाऱ्या संभाषणापासून ते अनोळखी व्यक्तीशी कसं वागायचं इथपर्यंतच्या गोष्टी शिकणं म्हणजे त्या बाळाचा होमवर्कच असतो. या काळात बाळाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषा उपयोगात आणता येत नसली तरी वेगवेगळे आवाज काढून, हसून, रडून ते व्यक्त होत असतं. या काळात मुलांशी घरातल्या व्यक्ती कशा वागतात, बोलतात? भावना व्यक्त करण्यासाठी कोणते शब्द वापरतात? त्यांची देहबोली कशी असते? या सगळ्याच गोष्टींचं निरीक्षण बाळ करत असतं. तेच त्याचं होमवर्क असतं. म्हणूनच या काळात पालकांची जबाबदारी अधिक असते.

पालक म्हणून तुम्ही एकमेकांशी काय बोलता, कसं बोलता, आवाजाचे चढउतार, इतरांबद्दल असणारी तुमची मतं आणि ती व्यक्त करताना असणाऱ्या तुमच्या भावना मुलं बारकाईने बघत असतात. यातूनच विशिष्ट व्यक्तीबद्दल मुलांचंही हळूहळू मत तयार होत असतं. याशिवाय मुलांशी बोलताना असणारी तुमची भाषा आणि त्यामागच्या तुमच्या भावनाही या काळात महत्त्वाच्या असतात. आई किंवा बाबा यांच्या आवाजातील बदल मुलांना लगेच समजत असतात. त्यातून आई चिडली आहे किंवा प्रेमाने समजावते आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. आपण नेमके कसे वागलो की, आई-बाबांची प्रतिक्रिया काय असते, हा सुद्धा मुलांचा एकप्रकारे गृहपाठच असतो.

हेही वाचा >> मुलांसाठी आवडीने खेळणी घेताना पालक म्हणून ‘हा’ विचार करता का?

युट्यूबवर जपानी आईचं एक चॅनल आहे. त्यात आपल्या मुलीसोबत ही आई जपानी संस्कृती आणि खानपान यासंदर्भातील व्हिडीओ अपलोड करते. मुलगी १० महिन्यांची असल्यापासून मुलीला किचनमध्ये मदतीला घेऊन ती विविध जपानी पदार्थ दाखवते. यामध्ये अंडी फोडणे, ती घुसळणे इथपासून सुरुवात करून आज ती ४ वर्षांची झालेली मुलगी सुरीने पनीर चिरणे, ओव्हन हाताळणे (आईच्या देखरेखीखाली) या गोष्टी करताना दिसते. मुख्य म्हणजे आई म्हणून वावरताना पेशन्स ठेवणं किती महत्त्वाचं आहे, मुलीशी सतत संवाद कसा साधावा, याबद्दल कोणतंही भाष्य न करता कृतीतून या गोष्टी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. मुलीकडून एखादी चूक झाली तरी न चिडता ती दुरुस्त करताना अशी चूक परत होऊ नये म्हणून काय करता येईल, यावर ही आई मुलीसोबत जशी चर्चा करताना दिसते तशीच आपली चूक झाल्यावर ती लगेच मान्यही करताना दिसते. ही गोष्ट मुलीच्या मनावर नक्कीच सकारात्मक परिणाम करणारी असेल.

आपण आता मोठे झालो, मोठ्यांप्रमाणे वागू शकतो हे अनेक मार्गांनी मूल आपल्याला दाखवत असतं. आई बाबांचे चप्पल, बूट किंवा शूज घालून फिरणं, आईच्या मेकअप किटमधून विविध गोष्टी वापरून आपला आपण मेकअप करणं, अशा अनेक गोष्टी करायला मुलांना आवडत असतं. पालक मात्र सतत ‘हे करू नकोस, त्याला हात लावू नकोस’ असं दटावत ‘सभ्यपणे वागण्याचा आग्रह’ करताना दिसतात. भांडी घासून आईला मदत करायला उत्सुक असणाऱ्या मुलांना “तुला नीट जमणार नाही, भांडी फुटतील” असं सांगून आपण त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवतो. यामागे मुलांना काही इजा होऊ नये (आणि आपले काम वाढू नये), असा जरी हेतू असला तरी, त्यामुळे मुलांचा नव्या गोष्टी शिकण्यातला रस हळूहळू कमी होऊ शकतो, निष्क्रिय बनण्याकडे त्यांचा प्रवास सुरू होऊ शकतो.

हेही वाचा >> बाळासाठी पाळणाघराची निवड कशी करावी? ‘या’ गोष्टी ध्यानात ठेवाच!

हे टाळायचं असेल तर पुढील मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे –

  • मुलांना स्वतंत्र व्हायला मदत करा – अमुक एक काम तू करू शकतोस, असा पालकांनी दाखवलेला विश्वास मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला मदत करतात.
  • अत्याधिक काळजी आणि प्रेम यामुळे मुलांना शिकण्याची संधीच मिळत नाही. त्याऐवजी छोटी-छोटी कामं मुलांना सांगून ती केल्यानंतर मिळणारी शाबासकी मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी असते.
  • लहान मुलांमध्ये नैसर्गिकरित्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक कुतूहल असतं. का, कसं, कुठे, केव्हा अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना समजून घ्यायची असतात. अशावेळी शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा केलेला प्रयत्न मुलांमध्ये नव्या गोष्टी शिकायला प्रोत्साहन देणारा असतो.

हेही वाचा >> आज खाऊच्या डब्यात काय देऊ? आईला सतत पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं?

आपल्या मुलांनी सोशल असावं, सर्वांशी मिळून मिसळून राहावं, अशी अपेक्षा सगळ्याच पालकांना असते. त्यासाठी पालक म्हणून आपण त्यांच्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांशी तुम्ही भावनिकदृष्ट्या किती जोडलेले आहात, यावर मुलंही तशी बनत जातात. आपल्याकडे एक म्हण आहे “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?” पालकत्वाला हीच गोष्ट लागू होते. पालक म्हणून तुम्ही मुलांसमोर काय आदर्श निर्माण करता? त्यांना कशी वागणूक देता? इतरांबरोबर असणारे मतभेद किंवा पालकांचं आपसात असणारं नातं मुलांना खूप काही शिकवणारं असतं. तोच त्यांचा होमवर्क असतो. तो त्यांच्याकडून कसा करवून घ्यायचा, यापेक्षाही त्यांच्यासमोर आपण कसा करायचा हा मुद्दा पालकांनी कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

(पूर्वार्ध)