घरातलं आवरून ऑफिसला जायला निघाले. घराबाहेर पडताच शेजारची तन्वी दिसली. तन्वी माझीच क्लासमेट, दोघीही एकाच वर्गात होतो, दोन वर्षांपूर्वी चांगलं स्थळ सांगून आलं, तिला मुलगा आवडला आणि हिने होकार कळवला. मुलगा एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरीवर होता. तो, त्याचे आई-वडील आणि बहीण असं चौकोनी कुटुंब होतं. अवघ्या काही महिन्यात दोन्ही कुटुंबांनी मुहूर्त काढला आणि लग्न झालं. तन्वी आणि मी शेजारीच होतो, एकत्र मोठ्या झालो, पण आमची मैत्री तितकीशी घट्ट नव्हती. त्यातही मी माझ्या नोकरीत गुंग होते, त्यामुळे तिचं काय चाललंय याबाबत फारशी कल्पना नव्हती. यावेळी तिला पाहिलं तेव्हा तिचा चेहरा बघून सारं काही आलबेल नसल्याचं मला जाणवलं.

घरातून जरा लवकर बाहेर पडलेले, थोडा वेळ होता, म्हटलं चला तन्वीला विचारावं की कसं चाललंय. मी तिला हाक मारली, हालहवाल विचारून झाल्यावर हळूच विचारलं, “काय गं तन्वी, चेहरा का पडलाय आणि यावेळी बरेच दिवस माहेरी थांबलीस? सगळं ठिक आहे ना”. आधी तर तिने ‘हो’ म्हणत वेळ मारून नेली आणि जास्त बोलणं टाळलं, पण माझा विश्वास बसला नाही, त्यामुळे तिला म्हटलं काही असेल तर सांग मनात ठेवू नकोस. त्यावर ती बोलू लागली. म्हणाली, “अगं सासरी सर्व ठिक आहे. नवरा चांगला आहे, नणंदेचं लग्न झालंय, सासरे तर खूपच शांत असतात. पण सासूचा फार त्रास आहे. लहान-लहान कारणांवरून भांडते, खरं तर घरात फक्त चार जण, त्यामुळे फार कामं नसतात. ती मी करून घ्यायचे, पण सासू त्यातही चुका काढायची. घरातली कामं, सासूचा जाच आणि नोकरी तिन्ही सांभाळता येत नव्हतं, त्यामुळे नोकरीचा राजीनामा दिला. मग तिला हवं तशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिच्या कुरबुरी संपल्याच नाहीत. एक दिवस तर हद्दच केली, छोट्याशा कारणावरून भांडली, मला नको नको ते बोलली, कहर म्हणजे तिने मला अर्ध्या रात्रीच घराबाहेर काढलं.”

bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

…तर काळजी नसावी!

तन्वीने जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. लग्नात मी तिच्या सासूला पाहिलेलं. तन्वीने सांगितलं तशी त्या दिवशी तरी मला ती वाटली नव्हती. मग मी तिला म्हटलं, “अगं सासू भांडते पण नवऱ्याचं काय, तो कुणाची बाजू घेतो?” त्यावर ती म्हणाली, “नवऱ्याचं आणि माझं कधीच साधं भांडणही झालेलं नाही. खूप समजून घेतो मला. त्यालाही त्याच्या आईचं हे बदललेलं वागणं पाहून धक्का बसलाय. तोही समजावण्याचा प्रयत्न करतोय. सासरे खूप शांत आहेत, तेही तिला तिचं वागणं चुकीचं असल्याचं सांगतात, पण ती त्यांचंही ऐकत नाही. मला ज्या दिवशी तिने घराबाहेर काढलं, त्यादिवशी त्याने माझी बाजू घेतली, तर तिने त्यालाही माझ्यासोबत घरातून निघून जायला सांगितलं. मग दोघेही त्याच्या मित्राकडे थांबलो. सासरे तिला सांगतात की तुझ्या पोटच्या मुलाशी तू असं कसं वागू शकते, त्यावर तो बदलला आहे, माझं ऐकत नाही, अशी कारणं ती देते. खरं तर ही गोष्ट मी माहेरी बरेच दिवस सांगितली नव्हती. एके दिवशी सासूनेच माझ्या आईला फोन केला आणि तुमच्या पोरीला घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. माझ्या घरच्यांना हे ऐकून धक्का बसला. ते तातडीने घरी पोहोचले. तर हिने त्यांचा अपमान केला आणि त्यांच्यासमोर माझ्यावर हात उगारला. तिचं हे रुप पाहून माझे आई-बाबा मला घरी घेऊन आले. म्हणून आता गेले काही दिवस मी इथेच आहे.”

तन्वीची ही कहाणी ऐकून मला सावरायलाच जरा वेळ लागला. शेवटी तिला विचारलं की, सासूला तिचा त्रास नेमका काय आहे? ती म्हणाली “मी सून आहे, हाच तिचा त्रास आहे. पाहुणे आले की माझ्याशी गोड गोड वागते. बरं अरेंज मॅरेज झालंय तरी तिला वाटतं की मी तिचा मुलगा तिच्यापासून लांब नेत आहे. आता नवीन लग्न झालं आणि नवरा माझ्याबरोबर असतो, त्यात मी त्याला लांब नेते, हा विचार तरी ती कसा करू शकते. खूप मानसिक त्रास सहन केला गं, त्या लोकांना भेटल्यानंतर मला कधीच असं वाटलं नव्हतं की ती अशी वागेल.”

नातेसंबंध : लक्ष असावं, लुडबुड नको !

ही होती तन्वीची कहाणी. तुमच्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. एखादी मुलगी लग्न करून सासरी आली की ती सासरच्या लोकांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी सासू सांभाळून घेण्याऐवजी उणी-दुणी काढत बसली तर ती तिथे रमू शकत नाही. टाळी एका हाताने नक्कीच वाजत नाही, पण माझी सासू माझ्याशी जसं वागली होती, तसंच मी माझ्या सूनेशी वागणार अशा मानसिकतेतून सुनांना त्रास देणाऱ्या अनेक सासू मी पाहिल्या. परिणामी लग्नानंतर घरात आनंदाचं वातावरण येण्याऐवजी सतत कुरबुरी होतात. त्यामुळे सासू आणि सूनेने मायलेकीसारखं नातं नाही फुलवता आलं तरी एकमेकींना सांभाळून घ्यायला हवं. त्यातंही वय आणि अनुभव पाहाता ही जबाबदारी सासूची अधिक असते. तुम्हाला काय वाटतं?