युनियन लोकसेवा आयोग किंवा यूपीएससी (UPSC) हे नाव जरी ऐकले तरी खूप अभ्यास, जिद्द अन् कठोर परिश्रम हे विचार लगेच डोक्यात येतात. पण, काही इच्छुक मंडळी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि यूपीएससीच्या परीक्षेत अगदी सहज उत्तीर्ण होतात. ९ ते ५ अशी पूर्णवेळ नोकरी करून यूपीएससीचा अभ्यास करणे अनेकांना कठीण जाते. काही जण यूपीएससीची परीक्षा आहे म्हणून नोकरी सोडतात किंवा सुट्टी टाकतात आणि पूर्ण वेळ फक्त आणि फक्त अभ्यासात घालवतात. पण, एका तरुणीने ९ ते ५ ही नोकरी करतानाच यूपीएससीचा अभ्यासही केला आणि आयएएस होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करून दाखवले.

नेहा बॅनर्जी असे या तरुणीचे नाव आहे. १९९५ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या नेहा बॅनर्जीचा शैक्षणिक प्रवास साऊथ पॉइंट हायस्कूलमधून सुरू झाला. त्यानंतर तिने आयआयटी (IIT) उत्तीर्ण केली आणि आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळवला; जिथे तिने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बी. टेक.ची (B.Tech) पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनियरिंग ही पदवी प्राप्त करताच तिला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. तिने दोन वर्षे प्रसिद्ध कंपनी ॲडोबमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीयर म्हणून काम केले. पण, तिची आयएएस अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याची सुप्त इच्छा होती.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
college girl commit suicide over love affair
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना

हेही वाचा…आयुर्वेदाच्या स्मृतीतून : मधुमेहाची राजधानी

२०२० मध्ये नेहाने तिच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. नेहा बॅनर्जी हिने ९ ते ५ या वेळेत नोकरी करता करता यूपीएससीची तयारीसुद्धा सुरू केली. सकाळी लवकर उठून ती पहिली नोकरीवर जायची आणि कामावरून आल्यानंतर वेळ काढून अभ्यास करायची. जॉबला शनिवार-रविवार सुट्टी असूनदेखील ती या सुटीच्या दिवसांत यूपीएससीचा अभ्यास करायची.

नेहा बॅनर्जीने २०१९ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली. तिने पहिल्याच वेळी यूपीएससीच्या तिन्ही फेऱ्या पहिल्याच प्रयत्नात क्लीअर केल्या आणि तिची अंतिम टप्प्यात निवड करण्यात आली. नेहाने यूपीएससी परीक्षेमध्ये संपूर्ण भारतात २० वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

हेही वाचा…स्त्रीबद्दल असभ्य शेरेबाजी करणाऱ्या नवऱ्यापासून फारकत! इटलीच्या पंतप्रधानांच्या निर्णयाची जगभर चर्चा

एका ब्लॉग पोस्टमध्ये नेहाने सांगितले की, तिच्या नोकरीचा शेवटचा दिवस ३१ जानेवारी २०२० हा होता आणि तिची यूपीएससीची मुलाखत १९ फेब्रुवारी २०२० रोजी झाली. तिला यूपीएससी निवडीच्या अंतिम फेरीच्या तयारीसाठी फक्त २० दिवसांपेक्षा कमी वेळ मिळाला होता. तसेच तिची मुलाखत सुमारे ३५ मिनिटे चालली; ज्यामध्ये तिला राष्ट्रीय सेवा योजनेतील (NSS) सहभागापासून ते स्वातंत्र्य आणि नागरी सेवकांपर्यंतच्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते. नेहा यांच्या यूपीएससीच्या तयारीमध्ये विविध कोचिंग सेंटर्समधील मॉक मुलाखती आणि ऑनलाइन साधने, विशेषतः यूट्युबचाही समावेश होता.

नेहा बॅनर्जी सोशल मीडियावरही सक्रिय आहे. सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्रामवर तिचे ७५ हजार (७५०००) फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्या काही दिवसांपूर्वीच्या पोस्टमध्ये तिने ‘बाजलो’ हे गाणेसुद्धा सादर करून दाखवले आहे. पूर्ण वेळ नोकरी सांभाळून आयएएस (IAS) अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नेहा बॅनर्जीला आपणसुद्धा सलाम करू या!