सतेज आपल्याशी लग्न करणार या गोष्टीवर विश्वास ठेवून तिनं त्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. आणि इथेच आपलं चुकलं असं संगीताला वाटत होतं. आपण थोडासा जरी संयम दाखवला असता, भाविनकदृष्ट्या विचार न करता डोक्याने विचार केला असता तर कदाचित हे घडलं नसतं असं आता तिला राहून राहून वाटतंय.

संगीता शहरातल्या एका नामांकित विधी महाविद्यालयामध्ये शिकतेय. लहानपणापासूनच हुशार, चुणचुणीत… शेंडेफळ असल्यानं घरात संगळ्यांचीच लाडकी. आयुष्यात कुठल्याही गोष्टीसाठी तिला फार खळखळ करावी लागली नाही. जे हवं असे ते लगेलच मिळत हाेतं… आयुष्य असं छान सुखात सुरू हाेतं. पण तिच्या या सुखदायी आयुष्यात नेमकं काय बिनसलं? एक असं वादळ तिच्या आयुष्यात आलं की सुखाचं हे स्वप्नवत वाटणारं आयुष्य पार विस्कटून गेलं… एक निर्णय तिचं आयुष्य विस्कटून गेला…

हेही वाचा : विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?

संगीता चारचौघींसारखी सामान्य घरातली लाडात वाढलेली मुलगी. अभ्यासात हुशार, शिस्तशीर… चारचौघांत तिची हुशारी लक्षात येत असे. अभ्यासात हुशार असल्यानं तिच्या आवडीचं शिक्षण घेण्याची मुभा आई-वडिलांनी दिली. तिच्या मनाप्रमाणे शहरातील नामांकित विधी महाविद्यालयामध्ये तिनं प्रवेश घेतला. सारं काही सुरळीत सुरू होतं…

तिच्या एकुलत्या एक भावाचं लग्न झालं आणि तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. वहिनीच्या रूपात घरात तिला हक्काची मैत्रीण मिळाली खरी, पण तिच्याच भावाने संगीताचा घात केला. लग्नानंतर काही दिवसांत तिचा भाऊ परदेशात नोकरीसाठी गेला. घरात आई-वडील, वहिनी आणि संगिता असत. भाऊ गेल्यानंतर घरात मदतीसाठी वहिनीचा दूरचा भाऊ सतेज अधून मधून घरी येत असे. सुनेचा भाऊ म्हणून घरच्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला घरातलंच मानलं.

संगीता आणि वहिनीचा भाऊ समवयस्कर असल्यानं या दोघांत मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र याच ठिकाणी संगीता गाफिल राहिली. वेगवेगळ्या ठिकाणी, कधी घरात दोघे मनाने-शरीराने एकत्र आले. त्यानं तिचे काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तिच्या नकळत काढले. एकीकडे तो लग्नाचं आमिष दाखवत होता, तर दुसरीकडे लग्नाचा विषय काढला की टाळाटाळ करत असे. पण संगीताच्या हातातून वेळ निघून गेली होती…

हेही वाचा : ‘मॉर्निग सिकनेस’चा सामना कसा कराल ?

संगीताच्या हे लक्षात आल्यावर ती त्याच्यापासून दूर राहू लागली. पण तो तिला तिचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला. वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागला.

या सर्व प्रकारामुळे तिला नैराश्य आलं. तोंड दाबून बुक्यांचा मार अशीच तिची अवस्था झाली होती. अखेर हिंमत करून तिनं सारा प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. पण या प्रकारामुळे घरातलं वातावरण ढवळून निघाले. आरोप, प्रत्यारोप, चिखलफेक सारं सारं सुरू झालं. हा सगळा प्रकार परदेशात असलेल्या भावाला कळला तेव्हा त्यानं याबाबत बायकोला जाब विचारला. मात्र वहिनीनं आपल्या भावाची- सतेजची पाठराखण केली. या प्रकरणामुळे संगीताचा भाऊ आणि वहिनी यांच्यात वादविवाद सुरू झाले. त्यांचा संसारही पणास लागला. घरातील मंडळीही संगीताला दोष देऊ लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतेज आपल्याशी लग्न करणार या गोष्टीवर विश्वास ठेवून तिनं त्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. आणि इथेच आपलं चुकलं असं संगीताला वाटत होतं. आपण थोडासा जरी संयम दाखवला असता, भाविनकदृष्ट्या विचार न करता डोक्याने विचार केला असता तर कदाचित हे घडलं नसतं असं आता तिला राहून राहून वाटतंय. पण चुकीबाबत पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा त्यातून सावरून नव्याने आयुष्याला सुरुवात करणं हेच योग्य. त्यासाठी घरच्यांबरोबरच समाजाचाही अधार महत्त्वाचा!